पुण्यात रेल्वे पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 04:33 AM2017-09-28T04:33:47+5:302017-09-28T04:34:34+5:30

पुणे लोहमार्ग पोलीस दलात काम करणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट असून तपास सुरू आहे.

Suicides caused suicide due to riot police in Pune, unclear reason | पुण्यात रेल्वे पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट

पुण्यात रेल्वे पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट

Next

पुणे : पुणे लोहमार्ग पोलीस दलात काम करणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट असून तपास सुरू आहे.

दीपक कोळी (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. कोळी निगडीमधील कृष्णा नगर येथील रेल्वे पोलीस क्वॉर्टर्समध्ये राहण्यास होते. त्यांचा विवाह झालेला असून पत्नी व मुलांसह ते राहण्यास होते. त्यांनी मंगळवारी रात्री राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पिंपरी चिंचवड मधील यशवंतराव चव्हाण शासकीय रुग्णालयात रात्री उशिरा त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांनतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या आत्महत्येमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Suicides caused suicide due to riot police in Pune, unclear reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.