इंदापूर येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 08:10 PM2019-04-04T20:10:24+5:302019-04-04T20:11:17+5:30
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी सतीश खाडे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील खंडोबाची वाडी येथील शेतकरी सतीश बाळासाहेब खाडे ( वय ४५ ) हे झालेल्या कर्जाला कंटाळून बुधवारी ( दि.३) रात्रीच्या सुमारास लाखेवाडी येथील राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोडणी गावातील शेतकरी सतीश बाळासाहेब खाडे यांच्यावरती कर्जाचा मोठ्या प्रमाणात बोजा झाल्याने ते कर्जबाजारी झाले होते. कर्ज फिटत नसल्याने ते कर्जाला कंटाळून गेले होते.. त्यामुळे सतीश खाडे याने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी बाळासो सोपान खाडे (वय ६५ ) यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला गुरुवारी ( दि. ४ ) रोजी सकाळी फिर्याद दिली आहे.
बुधवारी रात्री ९ वाजत सतीश याने त्याच्या कुटुंबियांसोबत जेवण केले. त्यानंतर नेहमीप्रमाणे सतीश लाखेवाडी गावाच्या हद्दीतील शेतीतल्या गोठ्यावर पत्र्याच्या घरात झोपण्यासाठी गेला. रात्रीच्या सुमारास त्याने या पत्र्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या झाल्याचे पहाटेच्या सुमारास वडिलांनी पाहिले.
कर्जबाजारीपणाला कंटाळून सतीश खाडे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. मयताच्या खिशात अथवा आसपास कोणत्याही प्रकारची चिट्ठी अथवा काहीही सापडून आलेले नाही. अशी माहिती इंदापूर पोलिसांनी दिली. तपास पोलीस हवालदार एन.पी पिंगळे व अंकुशराव खोमणे करत आहेत.
दुकानदार व व्यापा?्यांनी पाळला दुखवटा ...
सतीश खाडे यांनी कर्जबाजारीपणामुळे गळफास घेतले असल्याची बातमी शहाजीनगर परिसरात वा?्यासारखी पसरली. त्यामुळे निरा - भिमा सहकारी साखर कारखाना परिसरातील व्यापा?्यांनी, दुकानदारांनी अंत्यविधी होईपर्यंत सगळे व्यवहार बंद ठेवून दुखवटा पाळला.
____________________________________________