मांजरवाडीत विधवेची मुलांसह आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 02:55 AM2017-09-12T02:55:04+5:302017-09-12T02:55:23+5:30
मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील विधवा महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पतीचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाल्याने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करीत असल्याचे महिलेने चिठीत नमूद केलेले आहे. हा प्रकार सोमवारी (दि. ११) रोजी दुपारी उघडकीस आला.
नारायणगाव : मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील विधवा महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पतीचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाल्याने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करीत असल्याचे महिलेने चिठीत नमूद केलेले आहे. हा प्रकार सोमवारी (दि. ११) रोजी दुपारी उघडकीस आला.
रेश्मा विनायक मुळे (वय २९), सृष्टी विनायक मुळे (वय ९ ), स्वराज विनायक मुळे (वय ६) अशी मृत्यू झालेल्याची नावे आहेत. हे सर्व जण मुळेमळा मांजरवाडी या ठिकाणचे रहिवासी आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार : रेश्मा मुळे या शेतात मजुरीसाठी जाते, असे सांगून ती मुलांना घेऊन रविवार (दि. १०) सकाळी ९ वाजता घरातून निघून गेली होती. सायंकाळी ती घरी आली नाही. ती नातेवाइकाकडे गेली असेल असे समजून तिच्या कुटुंबीयांनी काहीच तक्रार केली नाही. सोमवारी (दि. ११) रोजी ३ वाजता सुमारास परिसरातील शेतकरी महादू कुशाबा खंडागळे यांच्या विहिरीत रेश्मामुळे यांचा मृतदेह तरंगताना अर्जुन गणपत खंडागळे यांच्या निदर्शनास आले तर सायंकाळी ६ ते ६:३० च्या सुमारास मुलगी सृष्टी व मुलगा स्वराज या दोन मुलांचे मृतदेह शोधण्यात यश आले.
रेश्मा विनायक ऊर्फ अप्पा मुळे ( वय ३०) यांचे पती विनायक बाबूराव मुळे हे ११ महिन्यांपूर्वी मयत झाले आहेत. पतीचे मयत झाल्याने ती तणावाखाली होती, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे.
माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये अशी चिठी या विवाहितेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.