सुखोईचा अपघात तांत्रिक बिघाडानेच!
By Admin | Published: October 16, 2014 11:35 PM2014-10-16T23:35:28+5:302014-10-16T23:35:28+5:30
पुण्याजवळील कोलवडी येथे कोसळलेल्या सुखोई विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुखोईचा अपघात झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.
वाघोली : पुण्याजवळील कोलवडी येथे कोसळलेल्या सुखोई विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुखोईचा अपघात झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्यामुळे ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ लवकरच संपून अपघाताचे नेमके कारण समजू शकेल आणि शेतक:यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असे हवाई दलाच्या सुत्रंकडून सांगण्यात आले.
प्रशिक्षण सुरू असताना हवाई दलाच्या सुखोई 3क् विमानामध्ये बिघाड झाल्याने वैमानिकांनी विमान कोलवडी येथील गायकवाड मळा परिसरामध्ये असणा:या मोकळ्या शेतामध्ये सोडून दिले होते. यामध्ये विमानाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. तीन दिवसांपासून अपघातग्रस्त परिसरात हवाई दलाच्या जवानांनी तळ ठोकला असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. याबाबत हवाई दलाच्या सुत्रंशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, विमानामध्ये उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकांनी विमान कोलवडी येथील शेताच्या परिसरामध्ये उतरविले प्रथदर्शनी दिसून येत आहे. अपघातामध्ये पुढच्या भागाचे नुकसान झाले असले तरी विमानाचे उर्वरित भाग व महत्वपुर्ण ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. गंभीर स्वरूपाच्या विमानाच्या अपघातामध्ये ब्लॅक बॉक्सची दुरावस्था होत असते. त्यामुळे कोर्ट ऑफ इनक्वायरीमध्ये वेळ लागतो, मात्र या अपघातग्रस्त विमानामध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्यामुळे विमानामध्ये कोणत्या स्वरूपाचे तांत्रिक बिघाड झाले आहे याबाबत लवकरच माहिती कळणार आहे आणि कोर्ट ऑफ इन्क्वायरीसुद्धा लवकरच संपेल. संपुर्ण माहीतीनंतरच विमान अपघातामुळे परिसरामध्ये शेतक:यांच्या झालेल्या पिकांची नुकसान भरपाई दिली जाईल. (प्रतिनिधी)
महसूल विभागाकडूनही पंचनामा
सुखोई कोसळल्यामुळे या परिसरातील शेतक:यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचा महसुल विभागाच्या वतीनेदेखील पंचनामा करण्यात आला आहे. तलाठी व मंडलाधिकारी यांनी अपघातग्रस्त ठिकाणी शेतक:यांच्या समवेत पंचनामा केला असल्याचे शेतकरी सोपान गायकवाड यांनी सांगितले.