सुलतान डांगे यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:08 AM2021-07-05T04:08:09+5:302021-07-05T04:08:09+5:30
बारामती : कळंब (ता. इंदापूर) येथील पोलीस शिपाई सुलतान डांगे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक ...
बारामती : कळंब (ता. इंदापूर) येथील पोलीस शिपाई सुलतान डांगे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक देऊन गौरवण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २) पुणे ग्रामीण जिल्हा मुख्यालयाच्या आवारामध्ये पोलीस कल्याण उपक्रमांतर्गत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने उभारण्यात आलेल्या बाणेर रोड व पाषाण रोड येथील दोन पेट्रोल पंपाचे उद्घाटन झाले. सुलतान डांगे हे राष्ट्रीय स्तरावर गाजलेले कबड्डीपटू आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्र पोलीस कबड्डी संघाचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करताना २ सुवर्णपदके मिळवली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत डांगे यांना पोलीस महासंचालक पदकाचा बहुमान प्रदान करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस महासंचालक पदक विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान पदक प्रदान करून गौरव करण्यात आला. त्यामध्ये पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, अशोक धुमाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण, पोलीस हवालदार संतोष बगाड व पोलीस शिपाई सुलतान डांगे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, मिलिंद मोहिते, भारत पेट्रोलियम कॉपोर्रेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक पी. एस. रवी यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.
कळंब (ता. इंदापूर) येथील पोलीस शिपाई सुलतान डांगे यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.
०४०७२०२१-बारामती-०१