Maharashtra | राज्याला एप्रिल महिना ठरणार 'तापदायक'; हवामान विभागाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 10:55 AM2022-04-01T10:55:05+5:302022-04-01T10:57:59+5:30

कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ७ टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता...

summer april month will be more heat in maharashtra meteorological department warning | Maharashtra | राज्याला एप्रिल महिना ठरणार 'तापदायक'; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra | राज्याला एप्रिल महिना ठरणार 'तापदायक'; हवामान विभागाचा इशारा

googlenewsNext

पुणे : उत्तर पश्चिम भारताच्या बहुतेक भागांसह मध्य महाराष्ट्रात यंदा एप्रिल महिना तापदायक ठरणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे (summer in maharashtra). हवामान विभागाने गुरुवारी एप्रिल महिन्यातील हवामानाचा अंदाज जाहीर केला. त्यानुसार, संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग येथील एप्रिलच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ७ टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

तर मराठवाड्याचा दक्षिणेकडील काही भाग, विदर्भातील गडचिरोलीचा परिसर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा परिसर येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सोलापूर दरम्यानच्या परिसरात कमाल तापमान सरासरीइतके राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

देशातील दक्षिण भारत, पूर्व भारताचा काही भाग, पूर्वोत्तर भारतलगतच्या भागात कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे.

Web Title: summer april month will be more heat in maharashtra meteorological department warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.