कामायनी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:11 AM2021-05-22T04:11:43+5:302021-05-22T04:11:43+5:30
पुणे : कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटी संचलित कामायनी विद्यामंदिर व कामायनी उद्योग केंद्रातर्फे शाळा व कार्यशाळेमधील विद्यार्थ्यांसाठी व ...
पुणे : कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटी संचलित कामायनी विद्यामंदिर व कामायनी उद्योग केंद्रातर्फे शाळा व कार्यशाळेमधील विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी ऑनलाईन उन्हाळी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात १५ शिक्षक व ७ निदेशक असे २२ जण पालक व विद्यार्थ्यांना विविध व्यवसायाचे मार्गदर्शन करत आहेत.
या अभिनव शिबिरात मास्क बनविणे, कापडी पिशव्या बनविणे, जुन्या वह्यामधील पानांपासून वही किंवा रायटिंग पॅड बनविणे, ग्रीटिंग कार्ड्स बनविणे, हस्तकलेच्या वस्तू बनविणे, तोरण, फुलांच्या माळा बनविणे, विविध सरबते बनविणे, मातीच्या वस्तू बनविणे, ग्रीटिंग कार्ड बनविणे व रंगभूषा यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ अरविंद कुलकर्णी, कार्याध्यक्ष डॉ. आशुतोष भूपटकर, कार्यकारी विश्वस्त श्रीलेखा कुलकर्णी, कालिदास सुपाते, सुजाता आंबे यांच्या प्रेरणेने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुगल मीटवर दररोज सकाळी ११ ते १२ या वेळेत हे शिबिर सुरू आहे.