उन्हाळी बाजरी आली फुलोऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:09 AM2021-04-22T04:09:57+5:302021-04-22T04:09:57+5:30

बाजरीचे पीक चांगले उत्पन्न देणारे असल्याने खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकरी खुशीत आहेत. पाऊस चांगला पडल्याने मुबलक पाणी उपलब्ध ...

Summer millet blooms | उन्हाळी बाजरी आली फुलोऱ्यात

उन्हाळी बाजरी आली फुलोऱ्यात

Next

बाजरीचे पीक चांगले उत्पन्न देणारे असल्याने खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकरी खुशीत आहेत.

पाऊस चांगला पडल्याने मुबलक पाणी उपलब्ध आहे. भामा आसखेड धरण परिसरातील तसेच भामा नदी काठासह परिसरातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचे पीक घेतले आहे. महिको सिंधू या जातीचे उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. उन्हाळ्यात स्वच्छ व दमदार हवामान उपलब्ध होत असल्याने बाजरीचे पीक जोरदार येऊन, उत्पादनही मोठे मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेताना दिसतात.

भामा आसखेड धरणातील पाणी नदीपात्रातून पिण्यासाठी व शेतीसाठी सोडण्यात येते. यामुळे नदी किनाऱ्यावरील शेतकरी विविध पिके घेत असतात. चाकण,खेड व पुणे येथे मोठी बाजारपेठ असल्यामुळे शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत आहे.त्याप्रमाणे अनेक शेतकरी आपला तरकारी माल मुंबईलाही पाठवत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

उन्हाळी बाजरी पेरणी केल्यानंतर खुरपणी, खतपाणी व तिची पक्ष्यांपासून निगा राखावी लागत असते.

पाणी मुबलक प्रमाणात मिळाल्याने यंदा बाजरीचे पीक जोरदार आले आहे. बाजरीची कणसे मोठी असून,दाणेही टपोरे आहेत. त्यामुळे बाजरीच्या उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी आगाऊ बाजरीची पेरणी केली होती. त्यामुळे यावर्षी बाजरीचे उत्पादन चांगले येणार असल्याचे शिंदे गाव येथील प्रगतशील शेतकरी सुनील देवकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

२१ आंबेठाण

शिंदे गाव येथील शेतकरी सुनील देवकर यांच्या शेतातील उन्हाळी बाजरीचे जोमदार पिक.

Web Title: Summer millet blooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.