उन्हाची काहिली निमाली
By admin | Published: April 25, 2017 01:59 AM2017-04-25T01:59:01+5:302017-04-25T01:59:01+5:30
राज्यातील उष्णतेची लाट आता ओसरली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात तीन ते चार अंशाची घट झाली असून
पुणे : राज्यातील उष्णतेची लाट आता ओसरली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात तीन ते चार अंशाची घट झाली असून विदर्भासह मराठवाड्यातील काहिली बऱ्याचअंशी कमी झाली आहे. दोन, तीन दिवसांनी कमाल व किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे़ विदर्भातील तुरळक ठिकाणी सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़
राज्यात सोमवारी सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४३़२ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १७़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ पश्चिम महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरातील कमाल तापमान ४० अंशाच्या खाली आले आहे़ विदर्भातील अमरावती, बुलढाणा येथील पाराही ४० अंशाच्या खाली असून, ते सरासरीच्या तुलनेत दोन अंशाने कमी आहे़ अन्य ठिकाणच्या तापमानात किंचित वाढ झाली आहे़
प्रमुख शहरांमधील तापमान : पुणे ३५़८, जळगाव ३७़२, कोल्हापूर ३६़६़, महाबळेश्वर ३१़१, मालेगाव ३९़६, नाशिक ३४़६, सांगली ३८, सातारा ३७़१, सोलापूर ४०़७, मुंबई ३४़, अलिबाग ३४़६, रत्नागिरी ३३, पणजी ३४़३, डहाणु ३३़८, उस्मानाबाद ४०़१, औरंगाबाद ३७़६, परभणी ४०, नांदेड ४०़५, अकोला ४०, अमरावती ३९़२, बुलढाणा ३६़५, चंद्रपूर ४३़२, गोंदिया ४२, नागपूर ४२़१, वर्धा ४२़़, यवतमाळ ४०़ (प्रतिनिधी)