रथसप्तमीनिमित्त दिव्यांग मुलांचे सूर्यनमस्कार शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:33 AM2021-02-20T04:33:05+5:302021-02-20T04:33:05+5:30
सम्यक योग या संस्थेतर्फे अनिकेत अनाथ मतिमंद मुलांची सेवाभावी संस्था यांच्याकरिता योग शिबिर आयोजित करण्यात आले. सम्यक योगचे योग ...
सम्यक योग या संस्थेतर्फे अनिकेत अनाथ मतिमंद मुलांची सेवाभावी संस्था यांच्याकरिता योग शिबिर आयोजित करण्यात आले. सम्यक योगचे योग प्रशिक्षक संजय ओस्तवाल यांनी मुलांकडून योग आणि सूर्यनमस्कार करून घेतले. मतिमंद मुलांसाठी प्राणायामचे विविध प्रकारही या वेळी त्यांनी करून घेतले.
कल्पना वप्रे या ʻअनिकेतʼ संस्थेच्या संस्थापक असून गेली २५ वर्षे त्या अनाथ मतिमंद मुलांसाठी संस्था चालवतात. सरकारकडून कोणतीही मदत न घेता समाजसेवेची जाण असणाऱ्या दानशूर नागरिकांच्या सहकार्यामुळे या आश्रमाचा कारभार चालू आहे. आज या संस्थेत ६ ते ४४ वयोगटातील ५२ मुले (२२ मुली, ३० मुले) आहेत.
या शिबिराला खेलरत्न ध्यानचंद पुरस्कार विजेते नंदन बाळ आवर्जून उपस्थित होते.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी योग प्रशिक्षक जयश्री पौआ, सुनील तलरेजा यांनी विशेष प्रयत्न केले.