‘सूर्यदत्ता’ने अनुभवली धम्माल मस्ती
By admin | Published: February 22, 2017 03:17 AM2017-02-22T03:17:47+5:302017-02-22T03:17:47+5:30
प्रचंड उत्सुकता, विद्यार्थ्यांच्या नजरा कॉलेजच्या प्रवेशद्वाराकडे, तेवढ्यात ‘बघतोस काय मुजरा कर’ या मराठी चित्रपटातील कलाकारांचे
पुणे : प्रचंड उत्सुकता, विद्यार्थ्यांच्या नजरा कॉलेजच्या प्रवेशद्वाराकडे, तेवढ्यात ‘बघतोस काय मुजरा कर’ या मराठी चित्रपटातील कलाकारांचे वाहन येते अन् सुरू होतो ‘जय भवानी जय शिवाजी’ असा जयघोष. त्यासोबत शिट्ट्या, कलाकारांची छबी टिकण्यासाठी कॅमेऱ्यांचा क्लिकक्लिकाट. हा रोमांचकारी अनुभव होता सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये.
अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे, अक्षय टांकसाळे, अनिकेत विश्वासराव यांना पाहण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एकच कल्ला केला. सूर्यादत्ता कॉलेजमध्ये ‘सूर्याेत्सवा’ची धम्माल मस्ती सुरू आहे. त्यात या कलाकारांनी उपस्थित राहत चार चाँद लावले.
संस्थेच्या वतीने संचालिका सुषमा चोरडिया यांनी चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा, तर प्रा. शेटे यांनी अनिकेत विश्वासराव, अक्षय टांकसाळे व इतर कलाकारांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांनी कलाकारांशी प्रश्नोत्तररुपी संवाद साधला.
हेमंत ढोमे म्हणाले, ‘‘चित्रपटात खलनायकी भूमिका मी करणार नव्हतो. पण, ही भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचा अचानक अपघात
झाला व इतर कलाकारांच्या
तारखा न जुळल्यामुळे माझा पर्याय वापरावा लागला व तो प्रेक्षकांनी वाह वाहची दाद देत स्वीकारला. यापुढेही अशा भूमिका करण्याचा प्रयत्न करेल. आपण सर्वांनी गडकिल्ल्यांची स्वच्छता व संवर्धन करण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.’’
संस्थेच्या पाचवी व सहावीच्या मुलांनी कलाकारांसोबत सिंहगड स्वच्छता मोहिमेत सहभागी होत कलाकारांची कौतुकाची थाप मिळवली. कार्यक्रमाच्या शेवटी कलाकारांसोबत काही विद्यार्थ्यांनी चित्रपटातील ‘कोंबडा’ गाण्यावर नृत्य केले. संदीप वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले.
(प्रतिनिधी)
ऐतिहासिक कलाकृतीमागे समाजाने उभे राहावे
पुणे : ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा, टाळ्यांच्या कडकडाटात ‘बघतोस काय मुजरा कर’ या मराठी चित्रपटाचा आनंद रसिकांनी घेला. निमित्त होते लोकमत व सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट आयोजित ‘बघतोस
काय मुजरा कर’ या चित्रपटाच्या खास शोचे. कोथरूडमधील सिटी प्राईड येथे चित्रपटाचा शो झाला.
या खास शोला प्रेक्षकांनी प्रचंड उत्साहात प्रतिसाद दिला. ऐतिहासिक कलाकृतींना समाजाचा पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी व्यक्त केली.
कलाकारांना भेटून ही रसिकांनी चित्रपटात गडकिल्ल्यांबद्दलच्या समस्यांचे वास्तव चित्रण केले. त्यामुळे टीमचे आभार मानले व चित्रपटाचे कौतुक पण केले. या वेळी सूर्यादत्ता इन्स्टिट्यूटचे संजय चोरडिया व सुषमा चोरडिया यांनी कलाकारांचे स्वागत केले. चित्रपटातील कलाकारांनी
सूर्यादत्ता व लोकमत सखी मंचच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करत अशा सामाजिक, ऐतिहासिक कलाकृतींमागे उभे राहण्यासाठी संस्थांनी समोर यावे, असे आवाहन केले.
सूर्याेत्सव आमच्याकडे विविध खेळ, डान्स स्पर्धा, फेब्रुवारीमधील स्पेशल सर्व डे यांसारख्या कार्यक्रमांनी साजरा होतो. या टीमने चित्रपटाच्या माध्यमातून चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचवला आहे. कॉलेजमार्फतही आम्ही अनेक गडांवर स्वच्छता मोहीम राबवणार आहोत.
- सुषमा चोरडिया,
संचालिका, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट