रडगाणे न गाता आव्हानाला सामोरे जा- सुनंदा पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 02:01 AM2019-01-23T02:01:31+5:302019-01-23T02:01:38+5:30
लैंगिक शिक्षणाअभावी व गर्भनिरोधकाचा अतिरिक्त वापर यामुळे महिलांचे गर्भाशय धोक्यात आले आहे.
कळंब : लैंगिक शिक्षणाअभावी व गर्भनिरोधकाचा अतिरिक्त वापर यामुळे महिलांचे गर्भाशय धोक्यात आले आहे. विज्ञान शाखेच्या मुली सर्व अवयवांचा अभ्यास करतात मग गर्भाशयाचा संकोच का? असा प्रश्न उपस्थित करून परिस्थितीचे रडगाणे न गाता जे मिळेल त्याचा आनंदाने स्वीकार करून आव्हानाला सामोरे जात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील रहा, असे आवाहन सुनंदा पवार यांनी केले.
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कळंब (ता. इंदापूर) महाविद्यालयात स्वस्थ कन्या स्वस्थ भारत उपक्रमांतर्गत ‘मुलींच्या आरोग्यविषयक समस्या’ चर्चासत्र कार्यक्रमाचे उद्घाटन बारामती अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी त्या बोलत होत्या.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉग्रेस चे उपाध्यक्ष वीरसिंग रणसिंग, राही रणसिंग, प्राचार्य डॉ. अंकुश आहेर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अॅग्रिकल्चर
ट्रस्टचे प्रकल्प समनव्यक बाळासाहेब नगरे, प्रा. एम. के. कदम,
प्रा. पी. एस. शिंदे, प्रा. भैरट,
प्रा डॉ. तेजश्री हुंबे, कार्यालय अधीक्षक शिवाजी कदम, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.