'सनबर्न'ने परवानगी घेताना केली दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 05:28 AM2017-12-18T05:28:46+5:302017-12-18T05:29:03+5:30

सनबर्न या कार्यक्रमास मुळशी तालुक्यामधून विरोध होत असून, बावधन, हिंजवडी पाठोपाठ आता लवळे गावचे ग्रामस्थ ही एकवटले आहेत. लवळे (ता. मुळशी) येथील ग्रामस्थांनी नुकतीच ग्रामसभा घेतली होती. त्यामध्ये सनबर्नच्या आयोजकांनी लवळे ग्रामपंचायतीची दिशाभूल करून ना हरकत प्रमाणपत्र मिळविलेले होते. परंतु ते ना हरकत पत्र आम्ही रद्द केलेले आहे, अशी माहिती लवळे गावच्या सरपंच विद्या क्षीरसागर यांनी दिली.

 The 'Sunburn' permission was misleading | 'सनबर्न'ने परवानगी घेताना केली दिशाभूल

'सनबर्न'ने परवानगी घेताना केली दिशाभूल

Next

पिरंगुट : सनबर्न या कार्यक्रमास मुळशी तालुक्यामधून विरोध होत असून, बावधन, हिंजवडी पाठोपाठ आता लवळे गावचे ग्रामस्थ ही एकवटले आहेत. लवळे (ता. मुळशी) येथील ग्रामस्थांनी नुकतीच ग्रामसभा घेतली होती. त्यामध्ये सनबर्नच्या आयोजकांनी लवळे ग्रामपंचायतीची दिशाभूल करून ना हरकत प्रमाणपत्र मिळविलेले होते. परंतु ते ना हरकत पत्र आम्ही रद्द केलेले आहे, अशी माहिती लवळे गावच्या सरपंच विद्या क्षीरसागर यांनी दिली.
कंपनीने जरी बळजबरीने हा कार्यक्रम घेतल्यास आत्मदहनाचा व आंदोलनाचा इशारा ही ग्रामस्थांच्या वतीने या ग्रामसभेमध्ये देण्यात आला. त्यानुसार या ग्रामसभेमध्ये सनबर्न या कार्यक्रमाचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर लगेचच संतप्त ग्रामस्थांनी नियोजित कार्यक्रमस्थळी भेट देऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या तयारीसाठी चालु असलेली सर्व कामे बंद पाडली.
२८ ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये लवळे (ता. मुळशी) येथील आॅक्सफोर्ड गोल्फ क्लब रिसॉर्ट येथे सनबर्ग हा कार्यक्रम होत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड या शहरात विरोध झाल्याने बावधन व लवळे गावच्या सीमेवर हा कार्यक्रम होत आहे. यासाठी मुंबई येथील मे. पर्सेंट लाइव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने लवळे ग्रामपंचायतीकडे दिनांक ४ डिसेंबर रोजी संगीतमय कार्यक्रम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. ग्रामपंचायतीने मिळालेल्या अर्जानूसार संगीतमय कार्यक्रम आहे म्हणून ना हरकत प्रमाणपत्र दिले होते.
यासंदर्भात सरपंच विद्या क्षीरसागर व उपसरपंच वैभव कुदळे यांनी सांगितले, की में. पर्सेंट लाइव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केलेल्या अर्जात सनबर्न कार्यक्रमाचा उल्लेख नव्हता. केवळ संगीतमय कार्यक्रमासाठी परवानगी पाहिजे, असे लिहिले होते. त्यामुळे कंपनीने ग्रामपंचायतीची दिशाभूल केल्याने प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.

Web Title:  The 'Sunburn' permission was misleading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे