रविवारी १३४ कोरोनाबाधित : २११ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:11 AM2021-09-27T04:11:53+5:302021-09-27T04:11:53+5:30
पुणे : शहरात रविवारी १३४ कोरोनाबाधित आढळून आले असून, २२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ८ ...
पुणे : शहरात रविवारी १३४ कोरोनाबाधित आढळून आले असून, २२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ६९४ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १.५४ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या १ हजार ४७३ आहे. तर दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही १८२ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २३१ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३३ लाख ३९ हजार ७३२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ३८५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८९ हजार ८९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ९ हजार २० जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील कोरोनास्थिती :
रविवारी बाधित : १३४
घरी सोडले : २११
एकूण बाधित रुग्ण : ५,००३८५
सक्रिय रुग्ण : १,४७३
आजचे मृत्यू : ०७
एकूण मृत्यू : ९०२०