रविवारी १९७ कोरोनाबाधित, २२२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:13 AM2021-08-23T04:13:48+5:302021-08-23T04:13:48+5:30
पुणे : शहरात रविवारी १९७ कोरोनाबाधित आढळून आले असून, २२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ८ ...
पुणे : शहरात रविवारी १९७ कोरोनाबाधित आढळून आले असून, २२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ७३३ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.५८ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ही २ हजार ७७ असून, आज दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही २०९ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २४८ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३० लाख ६२ हजार २४३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९१ हजार ८६२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८० हजार ९०० जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८८५ जणांचा मृत्यू झाला आहे.