नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे रविवारी बालनाट्य अभिवाचन महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:16+5:302020-12-27T04:08:16+5:30
पुणे : नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे रविवारी (दि. २७) बालनाट्य अभिवाचन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश ...
पुणे : नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे रविवारी (दि. २७) बालनाट्य अभिवाचन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी ही माहिती दिली. दहा महिन्यांच्या कालावधीनंतर नाट्यसंस्कार कला अकादमीतील कलावंत रंगमंचावर पुनरागमन करणार असून सहा बालनाटिकांचे वाचन करणार आहेत. हा महोत्सव सायंकाळी पाच वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृहात होणार आहे.
या महोत्सवात सावल्या (लेखक-दिग्दर्शक अमोल जाधव), बिन कपड्याचा राजा (लेखक-दिग्दर्शक प्रकाश पारखी), अळी मिळी गुपचिळी (लेखक-दिग्दर्शक संध्या कुलकर्णी), पिटुकल्या गोष्टी (लेखक-दिग्दर्शक राजश्री राजवाड-काळे), गांधी व्हायचं आम्हाला (लेखक - धनंजय सरदेशपांडे, दिग्दर्शक दीपक काळे), प्रिय बाबा (लेखक-दिग्दर्शक अंजली दफ्तरदार) ही बालनाट्ये सादर केली जाणार आहेत. हा महोत्सव नाट्यसंस्कार कला अकादमीच्या यू-ट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक पेजवर बघायला मिळणार आहे.
--=-=-