रविवारी रुग्णसंख्या पुन्हा साडेसहा हजारांच्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:10 AM2021-04-12T04:10:40+5:302021-04-12T04:10:40+5:30
पॉझिटिव्हिटी दर (आजचा) : २७ टक्के पॉझिटिव्हिटी दर (आजवरचा) : १९ टक्के ६,६७९ रुग्णांची वाढ : ४६२८ रुग्ण ...
पॉझिटिव्हिटी दर (आजचा) : २७ टक्के
पॉझिटिव्हिटी दर (आजवरचा) : १९ टक्के
६,६७९ रुग्णांची वाढ : ४६२८ रुग्ण झाले बरे तर ४८ जणांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून रविवारी दिवसभरात ६ हजार ६७९ रुग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात ४ हजार ६२८ रुग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १०४५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५२ हजार ४७६ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या एकाच दिवसात दोन हजाराने वाढली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १०४५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ४ हजार ९५६ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ७४८ झाली आहे. पुण्याबाहेरील १० मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिवसभरात एकूण ४ हजार ६२८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ७१ हजार ४३७ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ३ लाख २९ हजार ६६१ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ५२ हजार ४७६ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २४ हजार ७७३ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १७ लाख २१ हजार ७१४ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.