रविवारी यंदाची सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:14 AM2021-02-23T04:14:47+5:302021-02-23T04:14:47+5:30

पुणे : शहरात पुन्हा मे-जून २०२० च्या कोरोनाबाधिताच्या वाढीच्या पुनरावृत्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे़ गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ...

Sunday saw the highest number of corona patients this year | रविवारी यंदाची सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ

रविवारी यंदाची सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ

Next

पुणे : शहरात पुन्हा मे-जून २०२० च्या कोरोनाबाधिताच्या वाढीच्या पुनरावृत्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे़ गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाबाधितांची वाढ होत असून, रविवारी २०२१ मधील सर्वाधिक कोरोनाबाधितांची वाढ झाली. ही संख्या ६३४ इतकी आहे़

रविवारी दिवसभरात पुणे शहरात ४ हजार ७०७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १३़ ४६ टक्के इतकी आहे़ शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारीही दररोज वाढत असून, १२ टक्क्यांपर्यंतही ही वाढ आता साडेतेरा टक्क्यांवर गेली़ तर सक्रिय रुग्णसंख्या ही २ हजार ८९६ इतकी झाली आहे़

शहरात ९ मार्च,२०२० ला पहिला कोरोनाबाधित आढल्यानंतर, कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच गेला़ मेच्या अखेरीस तथा जूनच्या पहिल्या आठवड्यात सहाशेच्या पुढे गेला़ नंतर सप्टेंबरमध्ये दोन हजारापर्यंत गेलेली ही कोरोनाबाधितांची संख्या हळू-हळू कमी होत जानेवारीत ९८ पर्यंत आली होती़ दरम्यान, नागरिकांचा मास्कविना बिनधास्त वावर, फिजिकल डिस्टसिंगच्या नियमावलीची पायमल्ली व जागोजागी होणारी गर्दी यामुळे आजमितीला पुन्हा कोरोनाबाधितांची वाढ झपाट्याने होऊ लागली आहे़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील विविध रुग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्याºकोरोनाबाधितांची संख्या ३५० वर गेली असून, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही १६४ इतकी झाली आहे़ दरम्यान, आज दिवसभरात २९४ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़

शहरात आजपर्यंत १० लाख ९९ हजार १३४ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९७ हजार ९६४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९० हजार २४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाला असून, आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८२६ जणांचा मृत्यू झाला आहे़

==========================

शहरातील आठवडानिहाय कोरोना रुग्ण स्थिती -

कालावधी चाचण्या कोरोनाग्रस्त रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट

१-७ फेब्रुवारी २२, ५६४ १२७५ ५.६५

८-१४ फेब्रुवारी २१,२४८ १८१६ ८.५४

१५-२१ फेब्रुवारी २७,३१९ २९७० १०.८७

------------------------------

Web Title: Sunday saw the highest number of corona patients this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.