स्वरचैतन्यातून पुणेकरांनी अनुभवला सप्तसुरांचा साक्षात्कार

By admin | Published: November 14, 2015 03:07 AM2015-11-14T03:07:52+5:302015-11-14T03:07:52+5:30

स्वर आणि वेणूचा सुरेल मिलाफ त्यास तबल्याची समर्पक साथ, ‘तेजो निधी लोह गोल’ ही बंदिश सादर होत असतानाच सूर्याच्या किरणांनी फुलून गेलेला आसमंत, त्या पाठोपाठ ढोलकी

Sune Sassoon's Interview With Swachhaitane | स्वरचैतन्यातून पुणेकरांनी अनुभवला सप्तसुरांचा साक्षात्कार

स्वरचैतन्यातून पुणेकरांनी अनुभवला सप्तसुरांचा साक्षात्कार

Next

पुणे : स्वर आणि वेणूचा सुरेल मिलाफ त्यास तबल्याची समर्पक साथ, ‘तेजो निधी लोह गोल’ ही बंदिश सादर होत असतानाच सूर्याच्या किरणांनी फुलून गेलेला आसमंत, त्या पाठोपाठ ढोलकी आणि तबल्याची रंगलेली जुगलबंदी, त्याला रसिकांनी दिलेली पसंतीची पावती असा अनोखा मेळ जुळून आला. रसिकांचा लाभलेला उदंड प्रतिसाद ही ‘लोकमत’ला पुणेकरांनी दिलेली पावतीच ठरली!
निमित्त होते ‘लोकमत’ दीपोत्सव आयोजित ‘स्वरचैतन्य’ या रंगतदार कार्यक्रमाचे. या कार्यक्रमातून सप्तसुरांचा ठेवाच जणू रसिकांनी अनुभवला. दिवाळी पाडव्यानिमित्त हा कार्यक्रम अमित गायकवाड यांच्या कृष्णसुंदर लॉन्स येथे झाला. बी. एन. अष्टेकर प्रस्तुत आणि कोहिनूर ग्रुपच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला. पं. विजय घाटे, पं. राकेश चौरसिया, राहुल देशपांडे, नीलेश परब, अनय गाडगीळ, ओंकार दळवी या प्रथितयश आणि लोकप्रिय कलाकारांनी कार्यक्रमात रंगत आणली.
पहाटेच्या प्रसन्न वातावरणात ‘स्वरचैतन्य’ या मैफलीची सुरुवात राहुल देशपांडे यांनी ठुमरीने केली. ‘सावरे ऐ जैयो’चे स्वर कानी पडताच रसिकांनी टाळ्यांचा गजर केला. सुरेल स्वरांनी सुरू झालेल्या मैफलीत चैतन्य निर्माण झाले. ‘वेणू’ हे भगवंताचे वाद्य. बासरी, कोशी, पावा, काहला, चुक्का अशी त्याची वेगवेगळी नावे. चैतन्यदायी वाणीनंतर या वेणूने रसिकांवर भुरळ घातली. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य असलेल्या पंडित राकेश चौरसिया यांनी चारूकेशी रागातील रचना सादर केली. वेणुवादनाने वातावरण अधिकच आल्हाददायक झाले. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील रचनांनी रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य केले.
‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ ही रचना सादर करून राहुल देशपांडे यांनी मैफलीचा समारोप केला.
बी. एन. अष्टेकरचे संचालक प्रशांत अष्टेकर व पवन अष्टेकर, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, काका हलवाईचे संचालक प्रथमेश गाडवे, राज ट्रेडिंगचे संचालक प्रशांत ओसवाल, आमदार मेधा कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. ‘आयबीएन लोकमत’ कार्यक्रमाचे टेलिव्हिजन पाटर्नर होते.
प्रास्ताविकात ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी रसिक आणि कलावंतांचे स्वागत करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
(प्रतिनिधी)
‘लोकमत’ने आयोजित स्वरचैतन्य दिवाळी पहाट कार्यक्रमात रसिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितच पुणेकरांच्या कलारसिकतेची प्रचिती देणारा आहे. या कार्यक्रमात बी. एन. अष्टेकर ग्रुपला सहभागी होण्याचा आनंद होत आहे. पुणेकरांनी दिलेल्या या उदंड प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार.
- प्रशांत अष्टेकर, संचालक, बी. एन. अष्टेकर

‘लोकमत’ने लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. ‘लोकमत’ खऱ्या अर्थाने पुण्यात ‘नंबर वन’ झाला आहे. दिवाळीनिमित्त ‘पाडवा पहाट’ हा कार्यक्रम आयोजित केला त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला ही आनंदाची गोष्ट आहे. ‘लोकमत’च्या उपक्रमांना आपले भविष्यातही सहकार्य कामय राहील.
- कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष, कोहिनूर ग्रुप

‘लोकमत’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला रसिकांचा लाभलेला प्रतिसाद हे त्यांचे ‘लोकमत’ आणि कलाकारांवरील प्रेमाचे प्रतीकच आहे. पुणे शहराची वाटचाल सध्या ‘स्मार्ट सिटी’कडे सुरू आहे. अशा कार्यक्रमांमुळे सांस्कृतिक शहर म्हणून अच्छे दिन नक्कीच येतील.
- मेधा कुलकर्णी, आमदार

पाडवा पहाटच्या सांस्कृतिक उपक्रमास पुणेकरांची मिळालेली दाद ही निश्चितच अविस्मरणीय बाब आहे. पुणेकरांनी भरभरून दिलेला प्रतिसाद अविस्मरणीय आहे.
- अमित गायकवाड, प्रमुख, कृष्णसुंदर लॉन्स

स्वर आणि तालाचा मिलाप असलेल्या या कार्यक्रमाचा आनंद काही औरच होता आणि आयडेंटिटी फाउंडेशनच्या मुलांबरोबर साजरी करण्यात आलेली दिवाळी ही अविस्मरणीय ठरली. - प्रथमेश गाडवे,
संचालक, काका हलवाई

Web Title: Sune Sassoon's Interview With Swachhaitane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.