वालचंदनगर परिसरात सूर्यफुल शेती बहरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 02:23 AM2017-09-15T02:23:45+5:302017-09-15T02:24:26+5:30
खाण्याच्या तेलाचे भाव गगनाला भिडलेले असल्याने वालचंदनगर परिसरातील शेतकरी सूर्यफुल भुईमूग अशा तेलयुक्त पिकांचे उत्पादन घेण्यासाठी सरसावला आहे. शेतक-याने धाडस करून सूर्यफुलाचे उत्पादन घेण्यास यावर्षी सुरूवात केलेले आहेत. सूर्यफुल बहरात आल्याने शेती लक्ष वेधून घेत आहे.
वालचंदनगर : खाण्याच्या तेलाचे भाव गगनाला भिडलेले असल्याने वालचंदनगर परिसरातील शेतकरी सूर्यफुल भुईमूग अशा तेलयुक्त
पिकांचे उत्पादन घेण्यासाठी सरसावला आहे. शेतकºयाने धाडस करून सूर्यफुलाचे उत्पादन घेण्यास यावर्षी सुरूवात केलेले आहेत. सूर्यफुल बहरात आल्याने शेती लक्ष वेधून घेत आहे.
वालचंदनगर, रणगांव, शिरसटवाडी या परिसरातील अनेक शेतकरी अनेक वर्षानंतर सूर्यफुल या नगदी पिके घेण्याकडे वळला
आहे. तब्बल ३० वर्षांनंतर सूर्यफुल मोठ्या डौलदारपणे डवलत असल्याने अनेकांची मने जिंकून घेतले जात आहे. सर्वत्र पिवळेधमक रान दिसत असल्याने अनेक तरूण आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यासाठी सरसावलेले दिसत आहेत. खरिपाच्या पेरणीत पहिल्यांदाच सूर्यफुलाची पेरणी करण्यात आलेली आहे. बाजारातील खाण्याच्या तेलाचे वरचेवर वाढत चाललेले भाव परवडत नसल्यामुळे शेतकरी घरच्या घरीच तेलाचे उपाय शोधून काढत आहेत. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत असून तालुक्यातून हद्दपार झालेल्या तूर उत्पादनाच्या क्षेत्रात कमालीची वाढ होताना दिसत आहे. शेकडो एकरात तुरीची पेरणी करून हजारो टन तुरीचे उत्पादन इंदापूर तालुक्यात घेण्यात
आलेले आहे. खरीपाच्या हंगामात पेरण्यात येणारे तुर, बाजरी, मुग, उडीद, सोयाबीन, सूर्यफुल या पिकाचे उत्पादनाच्या क्षेत्रात वाढ होत आहे.
गेल्यावर्षी या भागातील शेतकºयाने तुरीचे भरमसाठ उत्पादन घेतले परंतु योग्य बाजारभाव मिळाले नसल्याने शेतकºयांत नाराजी पसरलेले होते. परंतु, ५ हजार भाव पहिल्यांदाच मिळाल्याने व डाळीचे कायमचे प्रश्न मार्गी लागल्यामुळे शेतकरी समाधानी होते.
याही वर्षी तूर, उडीद, मूग, सोयाबीन त्यात भर म्हणून सूर्यफुलाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे.