दिवाळीची सुरेल पहाट रंगणार ३१ आॅक्टोबरला

By Admin | Published: October 23, 2016 03:44 AM2016-10-23T03:44:54+5:302016-10-23T03:44:54+5:30

दिवाळी म्हणजे सुख, समृद्धी, आनंद आणि उत्साहाचे प्रतीक, अशा समयी कुटुंबासमवेत चैतन्यमयी वातावरणात दिवाळीचा सुरेल आनंद घेणे म्हणजे जणू पर्वणीच. यंदाच्या वर्षी अशा

The sunshine dawn of Diwali will be played on October 31 | दिवाळीची सुरेल पहाट रंगणार ३१ आॅक्टोबरला

दिवाळीची सुरेल पहाट रंगणार ३१ आॅक्टोबरला

googlenewsNext

पुणे : दिवाळी म्हणजे सुख, समृद्धी, आनंद आणि उत्साहाचे प्रतीक, अशा समयी कुटुंबासमवेत चैतन्यमयी वातावरणात दिवाळीचा सुरेल आनंद घेणे म्हणजे जणू पर्वणीच. यंदाच्या वर्षी अशा या प्रसन्न क्षणी तुम्हाला दिवाळी पाडवा पहाटचा आनंद लुटता येणार आहे आणि तोही लोकमतसमवेत!
जय मातृभूमी युवा मंच आणि राहुल कन्स्ट्रक्शन्स यांच्या सहयोगाने लोकमत दीपोत्सवांतर्गत स्वरचैतन्य हा कार्यक्रम पाडव्याच्या दिवशी म्हणजे सोमवार, दि. ३१ आॅक्टोबर रोजी पोदार इंटरनॅशनल स्कूल ग्राऊंड, काकडे पार्क, तानाजीनगर, चिंचवड येथे पहाटे ५.०० वा. होणार आहे. कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक मँगो हॉलिडेज हे आहेत. दिवाळीत सूर, लय आणि ताल यांच्या अद्वितीय आविष्काराची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवयास मिळणार आहे. शास्त्रीय, सुगम आणि फ्युजनचा अनोखा नजराणा सादर होणार आहे.
जयतीर्थ मेवुंडी (प्रसिद्ध शास्त्रीय गायक), शौनक अभिषेकी (प्रसिद्ध शास्त्रीय गायक), सावनी शेंडे (प्रसिद्ध शास्त्रीय गायक), अमर ओक (सुप्रसिद्ध बासरीवादक), अनय गाडगीळ (सिंथेसायझर), ओंकार दळवी (पखवाजवादक), तन्मय देवचके (हार्मोनियमवादक), हर्षद कानिटकर (तबलावादक), अभिजित भदे (ड्रम्स), आनंद देशमुख (निवेदक) आदी प्रतिभावंत कलाकार सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The sunshine dawn of Diwali will be played on October 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.