सनसिटीत धमाल आनंदाची कमाल
By admin | Published: May 31, 2017 02:48 AM2017-05-31T02:48:13+5:302017-05-31T02:48:13+5:30
उन्हाळी सुट्या लागल्याने पूर्ण मोकळ्या वेळेचा आनंद लुटण्यासाठी सिंहगड परिसरातील विद्यार्थ्यांनी सनसिटी रस्त्यावर लोकमतच्या
उन्हाळी सुट्या लागल्याने पूर्ण मोकळ्या वेळेचा आनंद लुटण्यासाठी सिंहगड परिसरातील विद्यार्थ्यांनी सनसिटी रस्त्यावर लोकमतच्या धमाल गल्ली कार्यक्रमात सहभाग घेतला. रविवारी सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत मुलेच नाही तर सर्वच वयोगटातील नागरिकांनी विविध खेळ खेळत धमाल केली. सकाळी सकाळी झालेली ही धम्माल लक्षणीय
ठरली.
रविवारची सकाळ सिंहगड रोड येथील सनसिटी येथे झालेल्या लोकमतच्या धमाल गल्लीच्या उपक्रमाने बालचमूंसाठी संस्मरणीय ठरली. या उपक्रमाला पालकांसह लहान मुलांनी प्रचंड गर्दीसह हजेरी लावली. तसेच यात विविध खेळांच्या मौजमस्तीची अनोखी पर्वणी अनुभवली.
सनसिटी रोडवर रंगलेल्या धमाल गल्लीत स्केटिंग, फ्लॅश मॉब, रस्सीखेच, आर्ट, क्रॉफ्ट, बॉलिवूड डान्स, क्रिकेट, बँड परफॉर्मन्स, पुणेरी पगडी या कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला.
लहान मुलांसाठी अँग्री बर्ड्स, स्नेक्स अँड लॅडर, किड्स कॉर्नर, फेस पेंटिंग असे अनेक प्रकारचे खेळ ठेवण्यात आले.
डीजेचा ठेका... जल्लोष आणि नृत्य अशी धमाल मुलांनी या धमाल गल्लीत केली. सहभागी झालेले लहान-थोर बक्षिसांचे मानकरी ठरले.
पुढील धमाल गल्लीची रंगत न्यू डीपी रोड महेश विद्यालयासमोर, कोथरुड येथे दि. ४ व ११ जूनला सकाळी ७ ते ९:30 यादरम्यान अनुुभवता येईल. याकरिता सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य राहील.
एमआयटी पुणेतर्फे उपस्थितांना एटीवीची सवारी करण्याची
संधी मिळाली.
या कार्यक्रमाचे प्रायोजक मेपल ग्रुप व हिरो ड्युएट, फिटनेस पार्टनर-फिटनेस मंत्राज, एज्युकेशन पार्टनर- रोझरी, सहयोगी प्रायोजक - सायकल वर्ल्ड, ज्वेलरी पार्टनर - एच. पी. ज्वेलर्स, किड्स पार्टनर - युरो किड्स हे होते.
लोकमत बालविकास मंच या कार्यक्रमाचे फोरम पार्टनर होते. या कार्यक्रमासाठी पुणे महापालिका, पुणे पोलीस व पुणे वाहतूक पोलीस यांचे सहकार्य लाभले.
मुलांचे आई-वडीलही यात सहभागी झाले. नकळत लहानपणीच्या दिवसांची सैर यानिमित्ताने झाल्याची भावना अनेक पालकांनी व्यक्त केली. यानिमित्ताने विविध स्पर्धा आयोजिण्यात आल्या होत्या. यात आपल्या मुलांसोबत ज्येष्ठांनी धमाल केली. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. सकाळच्या उन्हात सापशिडीपासून अँग्री बर्ड्सपर्यंत, बुद्धिबळापासून क्रिकेटपर्यंत, सायकलिंगपासून मोपेड राईडपर्यंत सर्व काही जल्लोषमय होते. ‘झुंबा’द्वारे आरोग्याचा
मंत्रही देण्यात आला.