जिल्ह्याच्या ठिकाणी उभारणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:12 AM2021-01-23T04:12:02+5:302021-01-23T04:12:02+5:30

पुणे : “राज्याच्या ग्रामीण क्षेत्राबरोबरच छोट्या शहरांमध्ये वैद्यकीय शिक्षण दिले जावे. त्यासाठी खाजगी संस्थांनी समोर यायला हवे. तसेच, ग्रामीण ...

A super specialty hospital will be set up in the district | जिल्ह्याच्या ठिकाणी उभारणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

जिल्ह्याच्या ठिकाणी उभारणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

Next

पुणे : “राज्याच्या ग्रामीण क्षेत्राबरोबरच छोट्या शहरांमध्ये वैद्यकीय शिक्षण दिले जावे. त्यासाठी खाजगी संस्थांनी समोर यायला हवे. तसेच, ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरात घेऊन जाण्याऐवजी त्यांचा तिथेच योग्य उपचार व्हावा. यासाठी राज्याच्या संपूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले जाईल,असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसीतर्फे आयोजित सार्वजनिक आरोग्य सेवा, शिक्षण आणि संशोधनावरील चार दिवसीय ऑनलाईन वर्ल्ड हेल्थ पार्लमेंटच्या उद्घाटन प्रसंगी देशमुख बोलत होते. खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. अंबुमणी रामदोस, सिक्कीमचे आरोग्य मंत्री डॉ. मणिकुमार शर्मा, जम्मू काश्मीरच्या आरोग्य मंत्री असिया नक्काश, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, महाराष्ट्राच्या कोविड १९ टास्क फोर्सचेे अध्यक्ष डॉ. संजय ओक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड होते.यावेळी

याप्रसंगी एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. एन. टी.राव, प्र कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद पांडे, स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. बी. एस. कुचेकर व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील उपस्थित होते.

अमित देशमुख म्हणाले,“कोरोनाच्या काळात आरोग्य क्षेत्रात कार्यरत सर्व कर्मचार्‍यांनी खूप मोठी समाजसेवी केली आहे. आज ही आपल्याला चांगल्या डॉक्टर्स, नर्सेस, स्पेशालिस्ट्स् आणि सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांची गरज आहे. सरकार आणि खाजगी संस्थांनी एकत्र येऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे. कार्यक्रमात डॉ. अंबुमणी रामदास, डॉ. सुभाष भामरे,डॉ. मणिकुमार शर्मा,असिया नक्काश, डॉ. विश्‍वनाथ कराड, राहुल कराड यांनी मनोगत व्यक्त केले.

---

वैद्यकीय क्षेत्रात देशाच्या स्थितीत मोठे बदल करावे लागतील. देशात हजार नागरिकांच्या मागे १ डॉक्टर व १ नर्स आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात वाढ होणे गरजचे आहे. त्यासाठी डॉक्टर, नागरिक, नर्सेस, विद्यार्थी, पॉलिसी मेकर्स आणि राजकारणी यांच्या योग्य सहयोगाने वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल घडवू शकतो.

- डॉ. संजय ओक,अध्यक्ष, कोविड १९ टास्क फोर्स, महाराष्ट्र

Web Title: A super specialty hospital will be set up in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.