सुपर स्प्रेडर सर्वेक्षणात १९२ कोरोनाबाधित सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:09 AM2021-06-25T04:09:12+5:302021-06-25T04:09:12+5:30

पुणे: जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांमध्ये मागील दोन महिन्यांपासून सुपर स्प्रेडर सर्वेक्षण सुरू आहे. यात मागील दहा दिवसांत २० हजार ३६१ ...

The Super Spreader survey found 192 corona | सुपर स्प्रेडर सर्वेक्षणात १९२ कोरोनाबाधित सापडले

सुपर स्प्रेडर सर्वेक्षणात १९२ कोरोनाबाधित सापडले

Next

पुणे: जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांमध्ये मागील दोन महिन्यांपासून सुपर स्प्रेडर सर्वेक्षण सुरू आहे. यात मागील दहा दिवसांत २० हजार ३६१ जणांच्या सर्वेक्षणामध्ये १९२ बाधित सापडले. प्रत्येक आठवड्याला सरासरी एक ते दीड हजारांच्या असपास हे बाधित सापडत आहेत. मात्र, सततच्या सर्वेक्षणामुळे ही संख्या आता घटत आहे, असे जिल्हा आरोग्य विभागाने म्हटले आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून कोरोना संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी विविध सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, व्यापारी म्हणजे ज्या व्यक्‍तींचा अनेक व्यक्‍तींबरोबर संपर्कात येते, अशी व्यक्‍ती ही सुपर स्प्रेडर ठरते. त्यामुळे प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची भीती अधिक आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाने या सुपर स्प्रेडर सर्वेक्षणाला सुरुवात झाली. साधारण १२ ते २६ मेच्या सर्वेक्षणात २७ हजार ६६३ सुपर स्प्रेडर सर्वेक्षणातून ५६९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर आता जून महिन्यात ८ ते १६ जूनदरम्यानच्या सर्वेक्षणात १९२ सुपर स्प्रेडर सापडले. मागील महिन्याच्या तुलनेत बाधित सापडण्याचे प्रमाण कमी होत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.

Web Title: The Super Spreader survey found 192 corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.