अधीक्षक आले शेतावर, ‘आत्मा’ अंतर्गत पाहणी : शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:03 AM2018-09-30T00:03:41+5:302018-09-30T00:04:04+5:30

Superintendent came to farm, survey under 'Soul': guidance made to farmers | अधीक्षक आले शेतावर, ‘आत्मा’ अंतर्गत पाहणी : शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

अधीक्षक आले शेतावर, ‘आत्मा’ अंतर्गत पाहणी : शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

Next

महुडे : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे अंतर्गत भोर तालुक्याच्या पाश्चिम भागातील दुर्गम डोंगरी भागातील महुडे खुर्द येथे राबविलेल्या यांत्रिकी भात लागवड प्रात्यक्षिकास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे बी. जी. पडघलमल यांनी भेट देऊन पाहणी केली.
या वेळी तालुका कृषी अधिकारी एस. व्ही. वडखेलकर, मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र डोंबाळे, कृषी पर्यवेक्षक के. बी. राऊत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे, कृषी सहायक पी. जी. भोये, डी. के. कवितके , बी. एस. ढाकणे हे उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी एस. व्ही. वडखेलकर यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेची माहिती दिली.

यांत्रिकी भातलागवड करण्यासाठी यांत्रिकरण योजनेअंतर्गत अनुदानावर भात लावणी यंत्रखरेदी करण्याचे आवाहन केले. शेतकºयांना मागील वर्षाची लागवड खर्च व आलेले उत्पादन; तसेच चालू वर्षाचा यांत्रिकी भातलागवड खर्च व येणारे उत्पादन यातील फरक कडण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी महुडे खुर्दचे सरपंच आकाश कुमकर प्रगतिशील शेतकरी सुदाम गोळे, निवृत्ती कुमकर, भरत कुमकर, शिवाजी बदक ,तसेच महिला शेतकरी रंजना गोळे, सिंधुबाई कुमकर व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

कृषी योजनांबाबत मार्गदर्शन

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा )
अंतर्गत भोर तालुक्यातील मोजे नाटंबी, महुडे खुर्द, सणसवाडी, हातवे, खानापूर येथील ५० एकर क्षेत्रावर यंत्राद्वारे भात लागवड करण्याची प्रात्यक्षिके राबविण्यात आलेली आहेत. यापैकी महुडे खुर्द येथील प्रात्यक्षिकास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पडघलमल यांनी भेट देऊन पाहणी केली. लाभार्थी शेतकºयांशी चर्चा केली.
भातपिकातील लव्हाळी तणाचे नियंत्रण करणे, भातपिकातील भेसळ करणे, कामगंध सापळ्याची दररोज पाहणी करून किड्यांची मोजणी करणे, एका दिवसातील किड्याांचे प्रमाण ३ पेक्षा जास्त आढळल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, भात पिकावरील करपा व कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवला तर करावयाच्या उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले.

Web Title: Superintendent came to farm, survey under 'Soul': guidance made to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे