घुबडांबाबतची अंधश्रद्धा दूर व्हायला हवी : पक्षितज्ज्ञ डॉ. जेम्स डंकन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 01:45 PM2019-11-30T13:45:19+5:302019-11-30T13:49:30+5:30

अंधश्रद्धा दूर होऊन पक्ष्यांना वाचविणे आवश्यक...

The superstition about the owls should be removed: Dr. James Duncan | घुबडांबाबतची अंधश्रद्धा दूर व्हायला हवी : पक्षितज्ज्ञ डॉ. जेम्स डंकन

घुबडांबाबतची अंधश्रद्धा दूर व्हायला हवी : पक्षितज्ज्ञ डॉ. जेम्स डंकन

Next
ठळक मुद्देजागतिक घुबड परिषदेचे उद्घाटनघुबडांची संख्या वाढविणे आणि टिकवून ठेवायला, या परिषदेचा उपयोग

पुणे : भारतामध्ये घुबड या पक्ष्याबाबत खूप अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे या पक्ष्यांची वसतिस्थाने नष्ट होत असून, जे शिल्लक आहेत ते धोक्यात आली आहेत. अंधश्रद्धा दूर होऊन त्यांना वाचविणे आवश्यक आहे. ही  जागतिक परिषद त्यासाठी खूप महत्त्वाची आहे. घुबडांची संख्या वाढविणे आणि टिकवून ठेवायला, या परिषदेचा उपयोग होईल, असे  जागतिक घुबड परिषदेचे समन्वयक आणि पक्षितज्ज्ञ डॉ. जेम्स डंकन यांनी सांगितले. 
तस्करी आणि जादूटोण्यामुळे घुबडांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी आजपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जागतिक घुबड परिषद सुरू झाली आहे. त्यामध्ये जगभरातील १६ संशोधक आले आहेत. इला फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जीवशास्त्र, पर्यावरण शास्त्र विभाग यांच्यातर्फे ही परिषद होत आहे.  पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रमुख पाहुणे वन विभागाचे मुख्य वन्यजीव संरक्षक नितीन काकोडकर, जागतिक घुबड परिषदेचे समन्वयक जेम्स डंकन, इस्रायलचे प्रख्यात पक्षितज्ज्ञ रुवेन योसेफ, इला फाउंडेशनचे प्रमुख आणि संयोजक डॉ. सतीश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाच्या प्रा. कल्पना पै यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन झाले. जागतिक पातळीवर या परिषदेचे यंदा सहावे वर्ष आहे. या घुबडांच्या छायाचित्र आणि माहिती पत्रकांचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. 
भारत आणि अन्य देशांतील संस्कृतीमधील घुबडविषयक संकल्पना या सत्रात भारतीय संस्कृतीतील घुबड या विषयावर  डॉ. सुरुची पांडे यांनी विचार मांडले.  
डॉ. काकोडकर म्हणाले की, घुबडांना वाचविणे गरजेचे आहे. पर्यावरणपूरक पर्यटनामध्ये घुबडाला महत्त्व दिले पाहिजे. वन विभागाकडून घुबडावर अभ्यास करण्यात येईल. तसेच ही परिषद त्यासाठी उपयुक्त ठरेल. विद्यापीठानेदेखील हातभार लावला पाहिजे. 
कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले की, भारतीय संस्कृतीत निसर्गाला महत्त्व दिले आहे.  त्यामुळे  निसर्ग-पर्यावरणाच्या संवर्धनाचे काम होणे आवश्यक आहे. सर्वांनी एकत्र 
येऊन घुबडांचे आणि एकूणच पर्यावरणाचे संवर्धन करायला पुढे येणे आवश्यक आहे. 
........
प्रदर्शनात घुबडांची माहिती 
४प्रदर्शनात घुबाडांचे छायाचित्रे, त्यांचा अधिवास, त्यांच्याविषयीची माहिती आदी नागरिकांना पहायला मिळेल. त्यामुळे नागरिकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ज्ञानेश्वर 
सभागृहात येऊन हे प्रदर्शन पहावे, असे आवाहन डॉ. सतीश पांडे यांनी केले. 
....
तीन, चार डिसेंबरला पिंगोरीत उलुक उत्सव 
४या परिषदेनंतर ३ आणि ४ डिसेंबरला इला फाउंडेशनच्या पिंगोरी येथील इला हॅबिटॅटमध्ये ग्रामीण अभ्यास केंद्रात उलुक उत्सव होणार आहे. 
४या महोत्सवात घुबडविषयक कीर्तन, कविता, नृत्य, नाटक, एकपात्री, लघुपट, फेस पेंटिंग, रांगोळी, छायाचित्रांचा समावेश आहे. राज्यभरातून घुबड प्रदर्शनासाठी सुमारे २ हजार जणांनी चित्रे पाठविली आहेत. त्यामध्ये निलगीरची टोपी, कागद, वनस्पती आदींपासून घुबडांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. 

Web Title: The superstition about the owls should be removed: Dr. James Duncan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे