बारामतीत अंधश्रद्धेचा बाजार : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी कासव तस्करी? दोन जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 08:13 PM2020-10-22T20:13:20+5:302020-10-22T20:14:26+5:30

कासवापासून पैशाचा पाऊस पडतो ही अंधश्रद्धा समाजात खूप प्रचलित आहे. 

Superstitious market in Baramati: Tortoise smuggling for money? | बारामतीत अंधश्रद्धेचा बाजार : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी कासव तस्करी? दोन जण ताब्यात

बारामतीत अंधश्रद्धेचा बाजार : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी कासव तस्करी? दोन जण ताब्यात

Next

बारामती: कासवापासून पैशाचा पाऊस पडतो ही अंधश्रद्धा समाजात खूप प्रचलित आहे. याच अंधश्रद्धेमुळे कासवांची लाखो रुपयांना तस्करी होते.  बारामती ग्रामीण पोलिसांनी देखील पैशाचा पाऊस पाडण्यासाठी सुरू असलेली कासव तस्करी उघड केली आहे .याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि २२ ) पहाटे तीनच्या सुमारास वंजारवाडी, बारामती हद्दीमध्ये दोन अनोळखी इसम रिक्षांमधून संशयितरित्या फिरत असल्याची माहिती ग्राम सुरक्षा दलाने दिली होती.याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी वंजारवाडी येथे तातडीने धाव घेतली. यावेळी राजू सजन गायकवाड (वय २२, रा. आमराई बारामती ),विजय अरुण गायकवाड (वय २१, रा. आमराई बारामती ) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.

यावेळी  त्यांच्याकडील ऑटो रिक्षा क्रमांक ( एम एचं बी २० ५४ )मध्ये हे एक कासव मिळाले. कासवाबाबत चौकशी केली असता त्यांनी ते विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले.कासव जवळ बाळगणे , त्याची विक्री करणे हा भारतीय वन्य अधिनियमानुसार गुन्हा आहे .कासवापासून पैशाचा पाऊस पडतो या अंधश्रद्धेमुळे कासवांची लाखो रुपयांना तस्करी होते. दोघांना त्यांच्या ताब्यातील कासव व ऑटोरिक्षा पुढील कार्यवाहीसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, प्रमोद पोरे, हवलदार दत्तात्रय कुंभार , रमेश नागटिळक,पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे, प्रशांत राऊत, मंगेश कांबळे, नंदू जाधव, विनोद लोखंडे, निखिल जाधव, अबरार शेख यांनी कासव तस्करी उघड केली .

Web Title: Superstitious market in Baramati: Tortoise smuggling for money?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.