खरिपाच्या पेरणीसाठी १८ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:01+5:302021-06-05T04:09:01+5:30

पुणे : जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणीसाठी प्रमुख पिकांच्या बियाणांची मागणी २३ हजार ९६७ क्विंटल होती. त्यापैकी १८ हजार १५७ क्विंटल ...

Supply of 18,000 quintals of seeds for kharif sowing | खरिपाच्या पेरणीसाठी १८ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा

खरिपाच्या पेरणीसाठी १८ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा

Next

पुणे : जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणीसाठी प्रमुख पिकांच्या बियाणांची मागणी २३ हजार ९६७ क्विंटल होती. त्यापैकी १८ हजार १५७ क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने भात, सोयाबीन, बाजरी, मका, मूग, तूर आणि उडीद बियाणांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी दिली.

मान्सून केरळमध्ये नुकताच दाखल झाला आहे. त्यामुळे राज्यातील खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. ४ जूनला पुणे जिल्ह्यात ३०.७ मिलिमीटर (१८ टक्के) पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपातील विविध पिकांच्या बियाणांची कमतरता भासू नये. यासाठी विशेष खबरदारी घेऊन ९० टक्क्यांहून अधिक बियाणांचा पुरवठा करण्यात आला.

----

जिल्ह्यातील प्रमुख बियाणांची मागणी/पुरवठा (क्विंटलमध्ये)

पिक/वाण मागणी पुरवठा

भात १२६८८ १२६४२

सोयाबीन ६४१३ ३७६६

बाजरी १९८० ५५६

मका २२५० १०५६

मूग २४८ ५४

तूर २०० ११३

उडीद १८८ ३०

एकूण २३९६७ १८१५७

Web Title: Supply of 18,000 quintals of seeds for kharif sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.