जिल्ह्यातील भरारी पथके ठेवणार रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:10 AM2021-04-12T04:10:02+5:302021-04-12T04:10:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गासोबतच रेमडेसिविर इंजेक्शनचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठीच जिल्हाधिकारी डाॅ. ...

The supply of remedicivir will be smooth | जिल्ह्यातील भरारी पथके ठेवणार रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत

जिल्ह्यातील भरारी पथके ठेवणार रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गासोबतच रेमडेसिविर इंजेक्शनचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठीच जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी तातडीने रविवारी अन्न व औषध प्रशासनची बैठक घेऊन रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा व वितरण सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आले.

डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे जिल्ह्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व उर्वरित सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व छावणी परिषद हद्दीकरिता भरारी पथकात अधिकारी/कर्मचारी यांची ११ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीसाठी नियुक्ती केलेली आहे.

पथकातील अधिकारी/कर्मचारी यांनी नियंत्रण कक्षातून प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने तसेच तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, अन्न व औषध यांच्या मध्ये समन्वय करायचा आहे.

जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी असलेले औषध विक्रेते/हॉस्पिटल याठिकाणी जाऊन तक्रारीची पडताळणी करावी. रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता व विक्री योग्य किमतीत होते किंवा कसे, याबाबत पडताळणी करण्यासाठी वेळोवेळी क्षेत्रीय स्तरावर भेटी द्याव्यात. याच बरोबर पथकास आवश्यकतेनुसार अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलीस आयुक्त, पुणे शहर, व पिंपरी-चिंचवड तसेच पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी मागणीनुसार अधिकारी व कर्मचारी यांची सेवा तत्काळ उपलब्ध करून द्यावयाची आहेत. पथकाने जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शन ौषधाच्या विक्रेत्याकडे अचानक भेट देऊन सदर इंजेक्शनचा काळाबाजार/जादा दराने विक्री किंवा इंजेक्शन शिल्लक असतानाही विक्री करत नाही असे आढळून आल्यास संबंधिताविरोधात कायद्यातील प्रचलित नियमानुसार पथकात नियुक्त अन्न व औषध प्रशासन विभागातील प्रतिनिधीमार्फत उचित कायदेशीर कारवाई करावी. वेळ पडल्यास या पथकातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सदस्यामार्फत गुन्हा नोंदवावा.

वरील कामकाजाचा अहवाल तत्काळ नियंत्रण कक्षास व अन्न व औषध प्रशासन, घटना व्यवस्थापक यांना सादर करावा. पथकाने जिल्ह्यातील कोविड-१९ रुग्णालयाद्वारे रेमडेसिविर इंजेक्शनचा योग्य वापर करण्यात येत आहे किंवा कसे? याबाबत तपासणी करून कार्यवाही करावी. याबाबत आरोग्य अधिकारी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी तज्ज्ञांची पथकात तत्काळ नियुक्ती करावी. वरील कामकाजाचा अहवाल तत्काळ नियंत्रण कक्षास व अन्न व औषध प्रशासन, घटना व्यवस्थापक यांना सादर करावा.

.......

आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई

आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग कायदा,१८९७ आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

- डॉ. राजेश देशमुख,

जिल्हाधिकारी

Web Title: The supply of remedicivir will be smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.