धाड टाकलेल्या कारखान्यातून नगरसेवकांना तूरडाळीचा पुरवठा

By admin | Published: November 17, 2015 03:20 AM2015-11-17T03:20:36+5:302015-11-17T03:20:36+5:30

पालकमंत्री गिरीश बापट यांनी खालापूर येथील ईटीसी अ‍ॅग्रो कंपनीवर धाड टाकून

Supply of turedel to the corporators from the factory | धाड टाकलेल्या कारखान्यातून नगरसेवकांना तूरडाळीचा पुरवठा

धाड टाकलेल्या कारखान्यातून नगरसेवकांना तूरडाळीचा पुरवठा

Next

पुणे : पालकमंत्री गिरीश बापट
यांनी खालापूर येथील ईटीसी
अ‍ॅग्रो कंपनीवर धाड टाकून
तूरडाळीचा साठा जप्त केला होता. त्याच कंपनीतून भाजपच्या नगरसेवकांना थेट दहा हजार किलो डाळ ९७ रुपये किलोने देण्यात आल्याचे बिलच महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी उघडकीस आणले आहे. पालकमंत्र्यांनी धाड टाकायची अन् नगरसेवकांनी ती कमी किमतीमध्ये विकायची, असा अत्यंत चुकीचा प्रकार सुरू असल्याची टीका शिंदे यांनी केली.
तूरडाळीच्या किमतीने दोनशे रुपयांचा आकडा ओलांडल्याने सर्वसामान्य जनता महागाईने होरपळून निघाली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने डाळीवर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांवर धाडी टाकून डाळीचे साठे जप्त केले. त्यामुळे डाळीचा आणखीच तुटवडा निर्माण झाला. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी १०० रुपयांनी तूरडाळ विक्री करणारे स्टॉल लावले.
मात्र, या स्टॉलमधून नागरिकांना नेमकी किती डाळ वितरीत करण्यात आली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर धाड टाकलेल्या कंपनीतून भाजपच्या नगरसेवकांना थेट डाळीचा पुरवठा करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने केला आहे.
अरविंद शिंदे यांनी सांगितले, की पालकमंत्री गिरीश बापट यांनी जप्त केलेली डाळ त्यांच्या मतदारसंघामध्ये स्टॉल लावून १०० रुपये किलोने विकली आहे.
भाजपचे नगरसेवक अशोक येनपुरे यांच्या नावे ८ नोव्हेंबर रोजी दहा हजार किलो डाळ पाठविण्यात आली. सध्या ग्राहक पेठेला स्वस्त दराने डाळ उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिक ग्राहक पेठेतून डाळीची खरेदी करत नाही, त्यामुळे ती त्यांच्यापर्यंत पोहचण्यात अडचणी येत आहेत.’

ईटीसी कंपनीकडून आलेल्या दहा हजार किलो तूरडाळीचे वाटप कार्यकर्त्यांमध्ये करण्यात आले. त्यांनी स्टॉल लावून स्वस्त दराने त्याची विक्री केली आहे. शहरामध्ये आतापर्यंत सव्वा लाख किलो तूरडाळ स्वस्त दरामध्ये विकण्यात आली आहे.
-अशोक येनपुरे, नगरसेवक

Web Title: Supply of turedel to the corporators from the factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.