आठ दिवसानंतर लोणीकाळभोर केंद्रला लसींचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:11 AM2021-05-06T04:11:53+5:302021-05-06T04:11:53+5:30

लोणी काळभोर : गेले आठ दिवसांपासून लसीचा तुटवड्या अभावी बंद असलेले लोणी काळभोर येथील केंद्रास जिल्हा परिषदेकडून डोस उपलब्ध ...

Supply of vaccines to Lonikalbhor Center after eight days | आठ दिवसानंतर लोणीकाळभोर केंद्रला लसींचा पुरवठा

आठ दिवसानंतर लोणीकाळभोर केंद्रला लसींचा पुरवठा

googlenewsNext

लोणी काळभोर : गेले आठ दिवसांपासून लसीचा तुटवड्या अभावी बंद असलेले लोणी काळभोर येथील केंद्रास जिल्हा परिषदेकडून डोस उपलब्ध झाल्याने आज एकूण ९०० जणांना लस देण्यात आली. यामध्ये मांजरी केंद्रातील ३०० जणांचा समावेश आहे. प्रथमच टोकण पद्धत अवलंबल्याने आज कोणत्याही गडबड गोंधळाविना लसीकरण सुरळीत पार पडले. राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी लस उपलब्धतेबाबत अनंत अडचणी येत आहेत. तसेच केंद्र शासनाने १ मे पासून १८ वर्षापुढील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली. जिल्ह्यातील १४ केंद्रावर या वयोगटाचे लसीकरणास सुरूवात झाली आहे. परंतु पोर्टल व्यवस्थित काम करत नसल्यानेे या वयोगटातील नागरिकही त्रासले आहेत.

त्यातच लोणी काळभोर केंद्रात ४५ वर्षावरील नागरिकांसाठी गेले सुमारे ८ दिवसांपासून लस उपलब्ध झाली नसल्याने आपल्याला दुसरा डोस कधी मिळणार या विवंचनेेत या गटातील नागरिक होते.

यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन आज लसीकरण सुरू होण्यापूर्वी आरोग्य अधिकारी डॉ. दगडू जाधव व डॉ. रुपाली बंगाळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केेंद्रातील आरोग्य कर्मचारी यांनी रांगेत ऊभे असलेल्या सर्वांना टोकण दिले. त्यानंतर प्रत्येकाची नोंद करून रक्तदाब तपासणी करून टप्प्या - टप्प्याने आत सोडले. यामुळे गर्दी असूनही कसलाही गडबड गोंधळ झाला नाही. आरोग्य अधिकारी डॉ. दगडू जाधव व डॉ. रूपाली बंगाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज लोणी काळभोर येथे ४५ वर्षावरील ५०० जनांना ४५ वर्षाखालील १०० जणांना तर मांजरी उपकेंद्र येथे ४५ वर्षावरील ३०० नागरिकांना लस देण्यात आली आहे.

पोर्टलला समस्या येत असल्याने अथवा अत्याधुनिक मोबाईल वापरता येत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर जावून तेथे नोंद करून लस घेणे हा पर्याय सोपा वाटत आहे. परंतु लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केेंद्र येथे जागेची कमतरता असल्याने त्यांना नाईलाजाने उन्हात उभे रहावे लागत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उठतो. हे टाळण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन सदर लसीकरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अथवा हायस्कूल मध्ये करण्याचे नियोजन केले तर सोशल डिसंन्सिंगचे पालन होवून नागरिकांचे उन्हापासून संरक्षण होईल. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना व्यतिरिक्त इतर आजारावर औषधोपचार घेण्यासाठी येतात त्यांनाही दिलासा मिळेल अशी चर्चा येथील नागरिक करत आहेत.

--

०५लोणीकाळभोर लसीकरण

फोटो - लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केेंद्र लोणी काळभोर येथे झालेली गर्दी.

Web Title: Supply of vaccines to Lonikalbhor Center after eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.