होळकर जलकेंद्रातून खडकीला पाणीपुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:27 AM2020-12-12T04:27:56+5:302020-12-12T04:27:56+5:30
पुणे : खडकी भागासाठी भामा आसखेड प्रकल्पामधून पाणी पुरवठा केला जावा अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका ...
पुणे : खडकी भागासाठी भामा आसखेड प्रकल्पामधून पाणी पुरवठा केला जावा अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सध्या चतुःश्रृंगी जलकेंद्रातून खडकीला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, खडकीला पुरेसे पाणी मिळत नाही. यावर पर्याय म्हणून भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी पुण्यात येईल त्यावेळी होळकर जलकेंद्राःतून पाणी पुरवठा करावा. होळकर पंप ते खडकी पाणी टाकीपर्यंत पाईपलाईन टाकलेली आहे, फक्त एक जोडणी शिल्लक आहे. त्यामुळे खडकीच्या पाणीपुरवठ्यासाठी फारसा खर्चही येणार नसल्याचे शिरोळे यांनी सांगितले.
तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांच्या निधीतून चाळीस लाख रुपये खर्चून पाणी टाकी ते खडकी बाजार अशी नवीन जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. खडकीच्याही पाणीपुरवठ्यात सुधारणा करता येईल, असे आमदार शिरोळे यांनी नमूद केले.