सराफ असोसिएशनचा मंचर बंद ठेवून पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:13 AM2021-08-24T04:13:51+5:302021-08-24T04:13:51+5:30
नवीन हाॅलमार्क कायद्यानुसार येणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन नंबरच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात यासाठी संपूर्ण देशात पुकारण्यात आलेल्या लाक्षणिक बंदला ...
नवीन हाॅलमार्क कायद्यानुसार येणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन नंबरच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात यासाठी संपूर्ण देशात पुकारण्यात आलेल्या लाक्षणिक बंदला मंचर सराफ सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने बंद ठेवून पाठिंबा दर्शविण्यात आला. महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य सागर प्रकाश काजळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालय येथे नायब तहसीलदार शेळकंदे यांना निवेदन देण्यात आले.आंबेगाव तालुका सराफ असोसिएशनने सुरुवातीपासूनच हॉलमार्क दागिन्याचे स्वागत केलेले आहे.तसेच विक्री सुद्धा हॉलमार्क दागिन्यांची करत आहोत.परंतु ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डने नवीन तरतूद केलेले नियम अत्यंत क्लिष्ट व जटिल आहेत. त्या मुळे ग्राहकांना दागिने मिळण्यास जास्त कालावधी लागणार आहे. तसेच खर्चही जास्त प्रमाणात येणार आहे. या कायद्याप्रमाणे ग्रामीण भागातील सराफी व्यावसायिकांना व्यवसाय करणे खूप कठीण झाले आहे. व्यवसाय करण्यापेक्षा इतर कारकूनगिरी वाढत आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, नायब तहसीलदार शेळकंदे यांनी निवेदनाचा स्वीकार केला. त्या वेळी महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य सागर प्रकाश काजळे, आंबेगाव तालुका सराफ असोसिएशनचे सचिव अमोल लोळगे, सदस्य सचिन काजळे, प्रभाकर सोनार, संतोष काजळे, अभिजित काजळे, तन्मय समदडिया, बाळासाहेब थोरात आदी सराफ असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.