विधानसभेतही राष्ट्रवादीला साथ द्या

By Admin | Published: October 11, 2014 11:37 PM2014-10-11T23:37:35+5:302014-10-11T23:37:35+5:30

परिषदेत निवडणुकीला ज्या प्रकारे भरभरून साथ दिलीत, त्याप्रमाणो आमदार अॅड. अशोक पवार यांना साथ द्या, असे एकमुखी आवाहन या सर्वानी केले.

Support the NCP in the Vidhan Sabha | विधानसभेतही राष्ट्रवादीला साथ द्या

विधानसभेतही राष्ट्रवादीला साथ द्या

googlenewsNext
>शिरूर :  शिरूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुनीता कालेवार यांच्यासह नगर परिषदेचे सर्व नगरसेवक-नगरसेविका यांनी आज रॅलीद्वारे सूरजनगर बागवाननगर, विठ्ठलनगर, महादेव नगर व गुजरमळा या परिसरात नागरिकांशी संपर्क साधला, नगर परिषदेत निवडणुकीला ज्या प्रकारे भरभरून साथ दिलीत, त्याप्रमाणो आमदार अॅड. अशोक पवार यांना साथ द्या, असे एकमुखी आवाहन या सर्वानी केले. 
सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या नगरसेवक, नगरसेविका व शिक्षण मंडळ सदस्यांच्या बैठकीत, आमदार अॅड. अशोक पवार यांनी 
शहराचा चेहरामोहरा बदलल्याने 
तसेच नगर परिषदेच्या विविध कामांसाठी गेली अडीच वर्षे सातत्याने मदत केल्याने सर्वानी आमदार पवार यांना जास्तीत जास्त मतदान शहरातून व्हावे, यासाठी स्वत: उमेदवार असल्याप्रमाणो काम करण्याच्या 
सूचना धारिवाल यांनी दिल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष भंडारी यांनी सांगितले. 
यानुसार आज नियोजनानुसार सूरजनगर, बागवाननगर, विठ्ठलनगर, महादवेनगर व गुजरमळा परिसरात नागरिकांशी त्यांनी संपर्क करून संवाद साधला. ‘विकासाची दिंडी’ या कार्यपुस्तिकेचे वाटपही करण्यात आले. 
माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, माजी नगराध्यक्षा सुवर्णा लटांबळे, अलका सरोदे, उज्ज्वला बरमेचा, नगरसेवक जाकीरखान पठाण, अशोक पवार, अबिद शेख, दादाभाऊ वाखारे, प्रवीण दसगुडे, नगरसेविका मनीषा गावडे, सुवर्णा लोळगे, संगीता शेजवळ, कविता वाघमारे, 
शैला साळवे, शिक्षण मंडळाचे सभापती संतोष शितोळे, उपसभापती रूपेश गंगावणो, सदस्य नीलेश खाबिया, मुझफ्फर कुरेशी, प्रशांत शिंदे, राजेंद्र जाधवराव,  विजय साखला, वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. शिरीष लोळगे,  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष रंजन झांबरे, सागर पांढरकामे आदी या वेळी उपस्थित होते. 
 
गेल्या पाच वर्षात आमदार पवार यांनी शहरात केलेली विकासकामे तसेच नगर परिषदेच्या माध्यमातून तसेच स्वनिधीतून धारिवाल यांनी केलेला शहराचा विकास यामुळे शिरूरची जनता आमदार पवार यांच्याच पाठीशी राहील. 
- सुनीता कालेवार
 
विकासाचा वेग  
निमोणो : शिरूर-हवेलीचे विद्यमान आमदार अॅड़ अशोक पवार यांनी मतदारसंघात सुमारे साडे पाचशे कोटी रुपयांची विकासकामे करून तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलला असून, हा विकासाचा वेग कायम राहण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मतदान करावे, असे आवाहन करडेच्या (ता. शिरूर) सरपंच कविताताई जगदाळे-पाटील या मतदारांना करत असून, आपल्या पातळीवर घरोघर जाऊन त्या व शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती मंगल लंघे या मतदारांना साद घालत आहेत. सध्या विधानसभेची निवडणूक असल्याने सर्वत्र पक्षांनी मोठमोठय़ा सभा, प्रचारदौरे, गावभेटी, कोपरासभा यांनी सध्या प्रचाराची राळ उडवली आहे. 
 
4प्रकाश धारिवाल यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या नगरसेवक, नगरसेविका व शिक्षण मंडळ सदस्यांच्या बैठकीत, आमदार अॅड. अशोक पवार यांनी शहराचा चेहरामोहरा बदलल्याने तसेच नगर परिषदेच्या विविध कामांसाठी गेली अडीच वर्षे सातत्याने मदत केल्याने सर्वानी आमदार पवार यांना जास्तीत जास्त मतदान शहरातून व्हावे, यासाठी स्वत: उमेदवार असल्याप्रमाणो काम करण्याच्या सूचना धारिवाल यांनी दिल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष भंडारी यांनी सांगितले. 

Web Title: Support the NCP in the Vidhan Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.