दूध ओतून संपास पाठिंबा

By admin | Published: June 2, 2017 02:59 AM2017-06-02T02:59:30+5:302017-06-02T02:59:30+5:30

पुणे-नगर महामार्गावर दूध ओतून वाघोलीतील दुग्धव्यावसायिक शेतकऱ्यांनी संपाला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच बाजार मैदानामध्ये

Support the pouring of milk | दूध ओतून संपास पाठिंबा

दूध ओतून संपास पाठिंबा

Next

वाघोली : पुणे-नगर महामार्गावर दूध ओतून वाघोलीतील दुग्धव्यावसायिक शेतकऱ्यांनी संपाला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच बाजार मैदानामध्ये तरकारी घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांनी आज पाठ फिरविली. व्यापाऱ्यांनी शेतमालाचा साठा करून ठेवल्याने शेतकऱ्यांच्या अनुपस्थितीचा फारसा परिणाम वाघोलीतील बाजारामध्ये जाणवला नाही.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बाजार मैदानामध्ये दररोज तरकारी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील तरकारी विक्री करण्यास पाठ फिरविली. दोन-तीन शेतकरी माल घेऊन विक्री करण्यासाठी आले होते; परंतु इतर शेतकऱ्यांची अनुपस्थिती आणि संप पुकारल्याची परिस्थिती पाहून पुन्हा परतले. दररोज केसनंद, मांजरी, कोलवडी, आव्हाळवाडी, भावडी परिसरातील सरासरी ३० शेतकरी तरकारी घेवून वाघोलीच्या बाजारामध्ये येत असतात. आज संपाच्या परिणामामुळे एकही शेतकरी उपस्थित राहिला नाही. संप असल्याकारणाने बाजारातील व्यापाऱ्यांनी शेतमालाचा साठा करून आज दिवसभर विक्री केली; यामुळे संपाचा फारसा परिणाम नागरिकांवर जाणवला नाही.

संपामुळे
दुधाचा तुटवडा
धनकवडी : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा परिणाम भाजीपाला तसेच दुधावर झाला असून खरेदी निम्म्यावर आली. काल खरेदी करून रात्री संप सुरू होण्यापूर्वी आलेले दूध गुरुवारी विकले जात होते. परंतु संकलन केंद्रावर दुधाची खरेदी निम्म्यावर पोहोचली असून, संकलन झालेले दूध गुरुवारी रात्री डेअरीपर्यंत पोहोचू शकले तर शुक्रवारी विक्री होऊ शकणार आहे, अन्यथा दुधाचा तुटवडा जाणवणार आहे, व त्याला दूध पावडरसारखा अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने शहरी ग्राहकांचे हाल होणार असल्याचे चित्र आजच दिसू लागले आहे.

पुण्यात आज चितळेचा दूध पुरवठा सुरळीत
पुणे : सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील चितळे डेअरीकडून दूध संकलन करण्यासाठी जाणाऱ्या गाड्या परिस्थिती लक्षात घेऊन बंद ठेवल्या आहेत़ मात्र, जे शेतकरी स्वत: दूध आणून डेअरीत घालतील, त्यांचे दुध स्वीकारले जाणार आहे़ पुण्यात शुक्रवारी दुधपुरवठा सुरळीत असणार आहे़ याबाबत चितळे समूहाचे श्रीकृष्ण चितळे यांनी सांगितले, की शेतकरी संपामुळे परिस्थिती तणावाची आहे़ त्यामुळे भिलवडी येथून गावागावात दूध संकलनासाठी जाणाऱ्या गाड्या सध्या बंद ठेवण्यात येणार आहे़ पुण्यात दररोज साधारण साडेचार लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो़ या गाड्या भिलवडीहून निघाल्या असल्याने शुक्रवारी पुणे शहरात दूध पुरवठा व्यवस्थित होणार असल्याचे त्यांनी सांगितले़

Web Title: Support the pouring of milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.