किसान सभेच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:11 AM2021-01-23T04:11:42+5:302021-01-23T04:11:42+5:30
तळेघर येथे आंदोलकांची भेट घेतली, त्यावेळी तळेघर येथे निवासी डॉक्टर असावेत, मुळ नियुक्तीस असलेल्या डॉक्टरांना मुळ जागीच आणावे, रूग्णांच्या ...
तळेघर येथे आंदोलकांची भेट घेतली, त्यावेळी तळेघर येथे निवासी डॉक्टर असावेत, मुळ नियुक्तीस असलेल्या डॉक्टरांना मुळ जागीच आणावे, रूग्णांच्या मृत्युस जबाबदार डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई व निलंबीत करावे, तळेघर येथील ग्रामीण रूग्णालय सुरू करावे. फलोदे (ता.आंबेगाव) येथील गर्भवती महिला व बाळाच्या झालेल्या मृत्यु प्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी चौकशी समिती नेमली होती त्या चौकशी समितीचा अहवाल जाहिर करुन सदरील प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. आदी मागण्या किसानसभेच्यावतीने करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्य व आरोग्य अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट देत अशोक पेकारी, राजू घोडे, कृष्णा वडेकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संपर्क साधला. दरम्यान, आज या मागण्यांसदर्भात चर्चा करण्यासाठी किसान सभेच्या शिष्टमंडळाला आयुष प्रसाद यांनी बोलावले आहे.
२२ तळेघर
आंदोलनस्थळी रुपाली जगदाळे, देविदास दरेकर यांनी भेट दिली.
तळेघर(ता.आंबेगाव) येथे सुरु असलेल्या आखिल भारतीय किसान सभेच्या आंदोलनाला जिल्हा परीषद सदस्या रूपाली जगदाळे, शिवसेना गटनेते देविदास दरेकर,यांनी भेट दिली.
तळेघर वार्ताहार संतोष जाधव
तळेघर(ता.आंबेगाव) येथे सुरु असलेल्या आखिल भारतीय किसान सभेच्या आंदोलनाला जिल्हा परीषद सदस्या रूपाली जगदाळे, शिवसेना गटनेते देविदास दरेकर,यांनी भेट दिली.
तळेघर वार्ताहार संतोष जाधव