सुप्रिया किंद्रे ठरली राज्यातील पहिली महिला डॉग इन्स्ट्रक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:22+5:302021-06-19T04:09:22+5:30
गंभीर व जटिल गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस दलात श्वान पथकाचा सिंहाचा वाटा असतो. पोलिसांना स्फोटके शोधून देणे, अमली पदार्थांचा ...
गंभीर व जटिल गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस दलात श्वान पथकाचा सिंहाचा वाटा असतो. पोलिसांना स्फोटके शोधून देणे, अमली पदार्थांचा शोध आणि गुन्हेगारांचा माग काढण्यास या श्वानांची मदत होते. शिवाजीनगर पुणे येथील प्रशिक्षण केंद्रात या श्वानांना बालपणापासूनच प्रशिक्षण दिले जाते. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिपत्याखाली या ठिकाणी श्वानांना प्रशिक्षण देण्यात येते. सीआयडीकडून या श्वानांना सातत्याने विविध प्रकारचे प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात येतात. या ट्रेनिंग सेंटरमध्ये महिला पोलीस नाईक म्हणून सुप्रिया किंद्रे (धुमाळ) या कार्यरत आहेत.
टेकनूर (मध्य प्रदेश) येथील प्रशिक्षण परिषदेस महाराष्ट्र राज्यातून दोन स्पर्धकांची निवड झाली होती. या प्रशिक्षण परिषदेस भारत देशातील विविध राज्यांतील प्रशिक्षणार्थी सामील झाले होते. तीन महिन्यांच्या कालावधीसाठी असलेल्या या परिषदेत पहिली भारतीय महिला डाॅग इन्स्ट्रक्टर होण्याचा मान सुप्रिया किंद्रे यांना मिळाला आहे. जर्मन शेफर्ड, डाॅरबरमॅन पिंचर (पोलीस डाॅग), गोल्डन रिट्रिवेर, रिट्रिवर लब्रोडोर या श्वानांना ट्रेनिंग देण्याचे काम त्या करत आहेत.
पोलीस नायक सुप्रिया यांच्या रूपाने पुणे पोलीस दलाबरोबरच भोरचा झेंडा देशभर फडकला आहे. भोरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याचे गौरवोद्गार आमदार संग्राम थोपटे यांनी काढले.
या वेळी युवा नेते अनिल सावले, पोलीस पाटील शरद किंद्रे (सुप्रियाचे वडील), चुलते अर्जुन किंद्रे, आई मंदाताई किंद्रे, जीवन भगवान धुमाळ (पती), दीपक कुमकर, अंकुश म्हस्के, जगन्नाथ गोळे, बालवडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : सुप्रिया किंद्रे हिचा सत्कार करताना आमदार संग्राम थोपटे व इतर.