पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर लागले सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे फलक!

By श्रीकिशन काळे | Published: June 4, 2024 11:00 AM2024-06-04T11:00:43+5:302024-06-04T11:04:25+5:30

या फलकाविषयी कार्यालयासमोरील कार्यकर्त्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, हा फलक रात्रीच लावण्यात आला आहे. कारण त्यांना या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येणार असल्याची खात्री होती.’’....

Supriya Sule, Amol Kolhe's congratulatory plaques appeared in front of the office of NCP in Pune! | पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर लागले सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे फलक!

पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर लागले सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे फलक!

Shirur Lok Sabha Result 2024| पुणे : लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर हळूहळू कल येऊ लागले आणि पुणे शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी फलक लागल्याचे दिसून येत आहे. बारामती आणि शिरूर मतदारसंघातील दोन्ही उमेदवार जिंकून येणार असल्याची खात्री असल्याने राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) शहर कार्यालयासमोर सकाळपासूनच अभिनंदनाचे फलक झळकले. (Baramati Lok Sabha Result 2024)

पुणे शहर व जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीमध्ये काही जागांवर अपेक्षेनूसार कोणते उमेदवार निवडून येणार याविषयीची खात्री राष्ट्रवादीला होती. त्यानूसार त्यांचे बारामती आणि शिरूरमध्ये दोन्ही उमेदवार आघाडीवर आहेत. त्यापूर्वीच पुण्यातील राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयासमोर सकाळपासूनच बारामतीच्या सुप्रिया सुळे आणि शिरूरचे डॉ. श्रीकृष्ण कोल्हे यांच्या अभिनंदनाचा भला मोठा फलक लावला होता. त्यामुळे सकाळपासूनच या फलकाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. तसेच चॅनल्सवर देखील हा फलक झळकला. या फलकाविषयी कार्यालयासमोरील कार्यकर्त्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, हा फलक रात्रीच लावण्यात आला आहे. कारण त्यांना या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येणार असल्याची खात्री होती.’’

Web Title: Supriya Sule, Amol Kolhe's congratulatory plaques appeared in front of the office of NCP in Pune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.