कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सापडलेल्या मधुमेही बालकांसाठी सुप्रिया सुळे ठरल्या " देवदूत "

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 04:34 PM2020-04-06T16:34:13+5:302020-04-06T16:42:39+5:30

बारामती शहरातील १८ मुलांना टाईप १ हा लहान मुलांना मधुमेहाचा दुर्धर आजा; साधारण एका मुलाला महिन्याला २० हजार रुपये खर्च..

Supriya Sule is a angel for diabetic child who found in Corona's lockdown | कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सापडलेल्या मधुमेही बालकांसाठी सुप्रिया सुळे ठरल्या " देवदूत "

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सापडलेल्या मधुमेही बालकांसाठी सुप्रिया सुळे ठरल्या " देवदूत "

googlenewsNext
ठळक मुद्देपुण्यातील जहांगीर ट्रस्टने बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी साधला संपर्क या मधुमेह रुग्ण मुलांना महिन्यातून दोन वेळा औषध व तपासणी मोफत केली जाते.

बारामती : देशात कोरोना संसर्गामुळे शासनाने देशात लॉकडाऊन केल्याने नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नाही. परिणामी बारामती तालुक्यातील लहान मुलांना टाईप १ या मधुमेहाचा दुर्धर आजार असलेले बालरुग्ण औषध,उपचारापासून आवश्यक औषधांपासुन वंचित होते. या मुलांना १५ दिवसांनी पुण्यातील जहांगीर रुग्णालयातून तपासणी व औषध आणण्यासाठी जावे लागते. पण या संचारबंदीमुळे त्यांना पुण्याला वाहतूक बंद आहे.त्यामुळे औषध वेळेत न मिळाल्यास या मुलांचा जीव देखील जाऊ शकतो .त्यामुळे अस्वस्थ झालेल्या जहांगीर मेडीकल ट्रस्टने  बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला.त्यावर खासदार सुळे यांनी त्याची दखल घेत  ही औषधे वेळेत या मुलांपर्यंत पोहचवून त्यांचा जीव वाचवला आहे.त्यामुळे खासदार सुळे या मुलांसाठी ''देवदूत''  ठरल्या आहेत.
बारामती शहरातील १८ मुलांना टाईप १ हा लहान मुलांना मधुमेहांचा दुर्धर आजार आहे. टाईप १ हा आजार अगदी काही महिन्यांच्या बाळांपासून १८ वर्षापर्यंतच्या मुलांना होतो.या मुलांना दिवसातून चार वेळा इंजेक्शन घ्यावी लागतात.  ही इंजेशन महागडी असून साधारण एका मुलाला महिन्याकाठी २० हजार रुपये खर्च येतो. या मुलांना हिराबाई काबसजी जहांगीर मेडिकल रिसर्च कडुनही औषधें दिली जातात.आजाराने बाधित असलेल्या  या रुग्णांना रोज चार वेळा हे इंजेक्शन घ्यावेच लागते . टाईप १ या मधुमेहावर जगात कुठे औषध नाही.त्यामुळे न चुकता यांना महिन्यातून दोन वेळा औषधांसाठी पुण्याला जावेलागते. मात्र कोरोना संसगार्मुळे या मुलांना पुण्याला जाणे , पुण्यातूनहॉस्पिटलला बारामतीला औषध देणे शक्य नव्हते.यावर जहांगीर ट्रस्टने बारामतीच्या खासदार सुळे यांच्याशी संपर्क साधून त्यांना वस्तुस्थितीसांगितली.त्यावर सुळे यांनी त्यांनी काळजी करू नका, त्या मुलांना वेळेत औषध दिली जातील, अशा शब्दात त्यांना दिलासा दिला.त्यांनी वेगाने हालचाली करत बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनायाबाबत सुचना दिल्या. बारामती शहर पोलीस स्टेशन कडुन परवानगी घेत औषधआणण्यासाठी गाडी पाठवली. लॉकडाऊनची शाश्वती नसल्याने सुळे यांनी त्यामुलांना  दोन महिन्याची औषध पोहोच केली. यामध्ये रिफिल इंजेक्शन, सुई,चेकिंग स्ट्रिप्स यांचा त्या औषधांमध्ये समावेश आहे.
—————————————————
...या रुग्णांना जिवंत असे पर्यंत इंजेक्शनच घ्यावे लागते...
 जहांगीर मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून टाईप १ या मधुमेह रुग्ण मुलांना महिन्यातून दोन वेळा औषध व तपासणी मोफत केली जाते. या आजाराला इंजेक्शन वेळच्यावेळी इंजेक्शन घेणे, त्यांची रक्तातील साखर '' चेक'' करणे हा एकमेव इलाज आहे.हे इंजेक्शन न घेतल्यास त्यांची रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो. अगदी साखर सातशे पर्यंत जाऊन जीव देखील जाण्याची भीती असते.तसेच  या रुग्णाच्या हृदय, डोळे, किडनी वर परिणाम होऊन हे रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतात. लहान मुलांना टाईप १ हा मधुमेह झाल्यावर तो बरा होत नाही .यावर गोळ्या, औषध उपलब्ध नाहित. या रुग्णांना जिवंत असे पर्यंत इंजेक्शनच घ्यावे लागते,असे जहाँगीर हॉस्पिटल च्या सिनिअर सोशल वर्कर संध्या गायकवाड यांनी ''लोकमत'' शी बोलताना सांगितले.
————————————————————
खासदार सुप्रिया सुळे यांनी आमच्या मुलांची औषध वेळेत आणून दिली .आमच्या मुलांची औषधे संपत आली होती .आता पुण्यातून औषध कसे आणायचे हा याच्या पुढे  मोठा प्रश्न होता. मात्र ,बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आम्हाला दोन महिन्यांनी औषध आणून दिली. आमचे फार मोठे काम केले आहे. विनोद कुलकर्णी, पालक

Web Title: Supriya Sule is a angel for diabetic child who found in Corona's lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.