अजितदादा आठवड्याला कामांचा आढावा घ्यायचे, पण आता कोणी वालीच नाही- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 02:14 PM2022-09-20T14:14:25+5:302022-09-20T14:25:04+5:30
दुर्दैवाने तीन महिन्यांपासून जिल्ह्याला पालकमंत्री नाही- सुप्रिया सुळे
पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामती मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळेेंंना आज पुणे मनपा आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी विविध नागरी समस्यांवर चर्चा केली. वारजे, धायरी, नऱ्हे भागात कचरा आणि पाण्याचे प्रश्न आहेत, त्याचा फॉलो अप घेण्यासाठी आयुक्तांना भेटल्याचे सांगितले. त्यावेळी त्या म्हणाल्या, अजित पवार पालकमंत्री असताना दर आठवड्याला पुण्यातील कामांचा आढावा घेत होते. मात्र आता दुर्दैवाने तीन महिन्यांपासून जिल्ह्याला पालकमंत्री नाही. त्यामुळे कामांचा आढावा होत नाहीय.
बारामती विजयसाठी भाजप जोरदार तयारी करत आहे. त्यासाठी देशाच्या अर्थमंत्री आणि भाजपा नेत्या निर्मला सीतारामण बारामती मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. त्यावर सुळेंना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, माझं आयुष्य सगळं पारदर्शक आहे. मी १३ वर्षांपासून लोकप्रतिनिधी आहे. सोशल मीडियावर माझ्या कामाचा आढावा घेतला तर समजेल, देशातील लोक मला फॉलो करतात. मला आनंद होत आहे की, देशाचे अर्थमंत्री बारामतीत येत आहेत. मी त्यांचं स्वागत करते. बारामती लोकसभा मतदार संघात अनेक चांगल्या गोष्टी, संस्था आहेत त्यांना जर खरच वेळ भेटला तर त्यांनी तेथे भेट द्यावी.
नवाब मलिकांकडे दुर्लक्ष?
यावर खासदार सुळे म्हणाल्या, नवाब मलिक यांना पक्षाने कधी डावललं नाही, मी रोज त्यांच्या मुलींशी बोलत असते. अजूनही ते आमचे चीफ स्पोक पर्सन आहेत. त्यामुळे नवाब मलिक अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्या कुटुंबाची २४ तास माझा कॉन्टॅक्ट असतो.