निवडणूका म्हटल्यावर विरोधी उमेदवार कोणीतरी असणारच : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 11:48 PM2018-11-13T23:48:29+5:302018-11-13T23:49:00+5:30

कुरकुंभ : दौंड तालुका सध्या बारामती लोकसभेच्या जागेकरिता विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात रासपाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी ...

Supriya Sule: There will be opposition candidates when elections are announced: Supriya Sule | निवडणूका म्हटल्यावर विरोधी उमेदवार कोणीतरी असणारच : सुप्रिया सुळे

निवडणूका म्हटल्यावर विरोधी उमेदवार कोणीतरी असणारच : सुप्रिया सुळे

googlenewsNext

कुरकुंभ : दौंड तालुका सध्या बारामती लोकसभेच्या जागेकरिता विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात रासपाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या नावाच्या संभाव्य चर्चेने यांचे नाव घेतले जात आहे. सध्या सुप्रिया सुळेदेखील दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असल्याने याबाबत तालुक्यातील सर्वच नागरिकांना मोठी उत्सुकता लागलेली आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारी अशी ही लोकसभेची जागा असल्याने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होईल शक्य तितका विरोध करण्याचे मनसुबे वारंवार होताना दिसून येतात. त्यामुळे मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा समोर करून बारामती येथेच आंदोलन करून मोठ्या प्रमाणात विरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मागील लोकसभेच्या निवडणुकीत महादेव जानकर यांना जरी पराभवाचा सामना करावा लागला असला तरी जानकरांना मिळालेलं मताधिक्य सुळे यांना विचार करण्यास भाग पाडणार होते. त्यामुळे येणाºया लोकसभेच्या रणधुमाळीत मताधिक्यात पीछेहाट टाळण्यासाठी सुळे जोमानं कामाला लागल्या आहेत.

मतदारसंघात सध्या जनतेच्या विविध विषयांवरील प्रश्नावरून त्या चांगल्याच आक्रमक झालेल्या दिसून येतात. दुष्काळाच्या परिस्थितीत प्रत्येक गावांना भेट देऊन सरकारच्या अपयशाची जाणीव त्या मतदारांना करून देत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त जनतेशी संपर्क करण्यावर त्यांचा भर आहे. दौंडमध्ये रेल्वेचा प्रश्न, दुष्काळाचा प्रश्न, पुरंदरमध्ये महागाईचा प्रश्न अशा विविध मागण्या घेऊन त्यांनी आंदोलन करून जनतेच्या प्रश्नाला आवाज देण्याचा प्रयत्न देखील केला आहे.

जनतेच्या अपेक्षेला खरे उतरणार
माझी प्राथमिकता हे माझे काम असल्याने मी जास्त वेळ कामासाठी देत आहे. निवडणुकीत आपल्याला कोणी तरी विरोधक असणारच, त्यामुळे विरोधी कोण आहे, यापेक्षा आपले काम किती जास्त व जनतेच्या अपेक्षेला खरे उतरणार आहे, यावरच भर देणार. - सुप्रिया सुळे, खासदार

लोकसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून कांचन कुल यांचे नाव चर्चिले जात असल्याने याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी आपण कामाला प्राधान्य देत असल्याचे सांगितले. कांचन कुल यांच्याबाबत स्पष्ट प्रतिक्रिया जरी दिली नसली तरी शेवटी माझ्याविरोधात कोणीतरी असणार आहेच, त्यामुळे कोणी जरी असले तरी जनतेला आपल्या कामाबद्दल विश्वास असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे संभाव्य उमेदवार कोण आहे, याकडे आपण जास्त लक्ष देत नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून येत आहे. मात्र दौंड तालुक्यातील राहुल कुल यांच्या समर्थकांनी सोशल मीडियाद्वारे एक प्रकारे सुळे यांना नवीन आव्हान उभे राहत असल्याची खलबते सुरू केले आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणात सध्या चर्चेला उधाण आले आहे.
 

Web Title: Supriya Sule: There will be opposition candidates when elections are announced: Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.