सुरेल मैफलीची रंगली आनंदयात्रङ्ख

By admin | Published: November 25, 2014 12:04 AM2014-11-25T00:04:41+5:302014-11-25T00:04:41+5:30

अमर ओक यांचे मंत्रमुग्ध करणारे बासरी वादन, तसेच बाल कलाकारांचे सुमधुर गायन यामुळे जणू आनंदयात्रच पुणोकरांनी अनुभवली. निमित्त होते डीएसके आनंदयात्र या कार्यक्रमाचे.

Surail concert playlist | सुरेल मैफलीची रंगली आनंदयात्रङ्ख

सुरेल मैफलीची रंगली आनंदयात्रङ्ख

Next
पुणो : आल्हाददायी वातावरणात रंगलेली सुरेल मैफल, श्रुती मराठे व मृण्मयी देशपांडे यांच्या नृत्याविष्कारावर धरलेला ठेका, अमर ओक यांचे मंत्रमुग्ध करणारे बासरी वादन, तसेच बाल कलाकारांचे सुमधुर गायन यामुळे जणू आनंदयात्रच पुणोकरांनी अनुभवली. निमित्त होते डीएसके आनंदयात्र या कार्यक्रमाचे. 
डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सतर्फे ठेवीदार व ग्राहकांसाठी स्नेहमेळावा घेण्यात आला. या वेळी आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत आणि मुग्धा वैशंपायन या पंचर}ांनी अनेक लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
‘जयोस्तुते’ या गाण्याने मैफलीस प्रारंभ झाला. त्यानंतर ‘प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा’, ‘आधी बीज एकले’, ‘मनं सूक्त तुझं गोष्ट हाये’, ‘कशाला उद्याची बात’ अशा एकाहून एक अजरामर गाण्याच्या सादरीकरणातून कृष्णधवल चित्रपटाच्या काळात श्रोत्यांना अलगदपणो नेले.
दिलखेचक नृत्य करणा:या अभिनेत्री श्रुती मराठे हिने प्रेक्षकांची विशेष दाद मिळविली. म्ििालंद कुलकर्णी व शर्वरी जेमनीस यांनी सूत्रसंचालनातून  ग. दि. माडगूळकर ते अजय अतुल असा सांगीतिक बदलाचा प्रवासच उलगडला. 
प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक यांनी चार गाण्यांची श्रृंखला सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.   
ज्ञानसूर्य म्हणून ख्याती असलेले व वयाच्या 95 वर्षीही चिरतरुण तेज असणारे गुरुवर्य दादा वैशंपायन यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. सचिन नाईक व त्यांच्या सहकार्यानी डी. एस. कुलकर्णी यांचा संघर्षमय प्रवास लेझर शोतून उलगडला.  (प्रतिनिधी)

 

Web Title: Surail concert playlist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.