बीएचआरप्रकरणी सुरज झंवर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:12 AM2021-01-23T04:12:15+5:302021-01-23T04:12:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी (बीएचआर) प्रकरणात पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी (बीएचआर) प्रकरणात पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेने आज जळगावमधून फरार आरोपी सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवर याला अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक केली आहे.
सुनील झंवर हा साई मार्केटिंग या कंपनीचा चेअरमन असून बीएचआर प्रकरणात कमी किमतीत मालमत्ता विक्री करणे, ठेवीच्या पावत्यांचे ३० टक्के पैसे देऊन प्रत्यक्षात १०० टक्के पैसे दिल्याचे दाखविणे असे आरोपी आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने जळगावात छापे घातल्यापासून तो व मुख्य सूत्रधार जितेंद्र कंडारे फरार आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एम. एच. ननावरे व त्यांच्या सहकार्यांनी आज जळगावमधील रामानंदनगर येथील सुनील झंवर यांच्या घरी छापा घालून त्यांचा मुलगा सुरज झंवर याला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला अटक केली. तशी जळगाव येथील पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलीस पथक सुरज झंवर याला घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहे.
सुरज झंवर याला अटक केली असून पोलीस पथक पुण्याकडे येत असल्याचे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांनी सांगितले.