सुरेखा पुणेकरांचे नावही काँग्रेसच्या यादीत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 08:38 PM2019-03-29T20:38:56+5:302019-03-29T20:40:25+5:30
लोककलावंत सुरेखा पुणेकर यांना काँग्रेसतर्फे पुणे लोकसभा लढण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा असताना त्यांचे नावही संभावित उमेदवारांच्या यादीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणेकर यांना कशी उमेदवारी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे :लोककलावंत सुरेखा पुणेकर यांना काँग्रेसतर्फे पुणे लोकसभा लढण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा असताना त्यांचे नावही संभावित उमेदवारांच्या यादीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणेकर यांना कशी उमेदवारी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी पुणेकर या काँग्रेसच्या तिकिटाच्या दावेदार असल्याचे समोर आले. एवढेच नव्हे तर त्याकरिता दिल्लीत त्यांनी तीन दिवस तळ ठोकल्याचेही सांगितले. त्यामुळे अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि अभय छाजेड या यादीत पुणेकर यांचेही नाव समाविष्ट झाले होते. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ही शक्यता फेटाळली आहे. ते बाबतीत माध्यम प्रतिनिधींना म्हणाले की, काँग्रेसतर्फे उमेदवारी देताना एक प्रक्रिया पाळली जाते. त्यात समितीतर्फे दावेदार निवडून, नावांवर चर्चा होते आणि मगच अंतिम निर्णय होतो.पुण्यासाठी विचारात असलेल्या नावांमध्ये कुठेही पुणेकर यांचे नाव नसल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही.