ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश वडगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:11 AM2021-03-17T04:11:01+5:302021-03-17T04:11:01+5:30
आळंदीत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत विद्यमान सात सदस्यांची पाचव्यांदा पुढील पाच वर्षांसाठी ...
आळंदीत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत विद्यमान सात सदस्यांची पाचव्यांदा पुढील पाच वर्षांसाठी एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सुरेश वडगावकर, उपाध्यक्षपदी विलास कुऱ्हाडे, सचिवपदी अजित वडगावकर, खजिनदारपदी डॉ. ज्ञानेश्वर पाटील याची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सभेला विश्वस्त लक्ष्मणराव घुंडरे, पांडुरंग कुऱ्हाडे, प्रकाश काळे आदी मान्यवर सभासद उपस्थित होते. सदर निवड झाल्याची माहिती सचिव अजित वडगावकर यांनी दिली.
सुरेश वडगावकर हे गेली ४४ वर्षांपासून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच आळंदी नगरपालिकेचे ते माजी नगराध्यक्ष, श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे विद्यमान अध्यक्ष, ध्यास फाउंडेशनचे उपाध्यक्ष असून अनेक संस्थांवर पदाधिकारी व सदस्य म्हणून काम करीत आहेत. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेने भौतिक सुविधा, विविध विकासकामे यांना प्राधान्य दिले असून संस्थेचा शैक्षणिक विकास साधण्यास यश मिळाल्याचे सचिव अजित वडगावकर यांनी सांगितले.