‘सर्जिकल’मुळे सैनिकांचे मनोबल वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:07 AM2018-04-30T04:07:31+5:302018-04-30T04:07:31+5:30
आपले शेजारील राष्ट्र पाकिस्तानच्या वाढत्या कारवाया, दहशतवादी हल्ले यांना प्रत्युत्तर देणे गरजेचे होते. शांततामय अशा आपल्या प्रतिमेचा गैरफायदा घेणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणे गरजेचे होते.
पुणे : आपले शेजारील राष्ट्र पाकिस्तानच्या वाढत्या कारवाया, दहशतवादी हल्ले यांना प्रत्युत्तर देणे गरजेचे होते. शांततामय अशा आपल्या प्रतिमेचा गैरफायदा घेणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणे गरजेचे होते. आपण त्यांच्यापेक्षा कुठेही कमी नसून जम्मू काश्मीरमधील उरी येथे झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे सैनिकांचे मनोबल वाढल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली.
बालगंधर्व रंगमंदिरात येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. सर्जिकल स्ट्राइकमध्ये सहभागी असलेले लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सत्कार अहिर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर उपस्थित होते. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. अहिर म्हणाले की, निंभोरकर यांच्या आजवरच्या कामगिरीत सर्जिकल स्ट्राइकचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे. शांतताप्रिय भूमिका स्वीकारणाºया भारताबद्दल शेजारील राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीपासून पाकिस्तानच्या कारवाया आणि कुरापती सुरु आहेत. मात्र आपले सैन्य त्यांना पुरून उरले असून, जशास तसे उत्तर देण्यात निंभोरकर यांच्यासारख्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
उरीमधील सैनिकांवर झालेला हल्ला हे आपल्यापुढे मोठे आव्हान होते. यामुळे एक प्रकारची भीती पसरली होती. सर्जिकल स्ट्राइकमुळे सैन्यात आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली. पाकिस्तान, बांगलादेश, चीन या देशांलगत असलेल्या सीमारेषेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सतर्क राहावे लागणार असून, म्यानमारमधून भारतात येणाºया रोहिंग्याच्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविले आहे.
सत्काराला उत्तर देताना निंभोरकर यांनी युद्ध, युद्धातील थरारक प्रसंग, आठवणी यांना उजाळा दिला. सीमेवर देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची लढण्याची प्रेरणा असामान्य असते. माणुसकी, आदेश पाळण्यासाठी जिवाची किंमत मोजणारे सैनिक, शब्दाला
प्राणापेक्षा जास्त महत्त्व, बांधिलकी
हे सगळे सैनिकांमध्ये पाहावयास मिळते. खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, आबा बागुल, सतीश देसाई, संजय नहार, सुनील महाजन आदी मान्यवर श्रोत्यांमध्ये उपस्थित होते.