"भाग गए रणछोड़ सभी, देख अभी तक खड़ा हूँ मैं" सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 08:14 PM2023-07-08T20:14:00+5:302023-07-08T20:19:54+5:30
सोशल मिडीयावर सुळे या कायम सक्रिय असतात...
बारामती (पुणे) : खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्याच्या पहिल्या दिवसापासून आपल्या वडिलांबरोबर खंबीरपणे उभ्या आहेत. पक्ष आणि कुटुंब फुटीनंतर देखील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याप्रमाणे सुळेदेखील नव्याने पक्ष बांधणीसाठी राजकीय मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी त्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येते. दमलेल्या बापासाठी, लेक नारळाच पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी, या कवितेद्वारे खासदार सुप्रिया सुळे सत्तानाट्याच्या पहिल्याच दिवशी सुळे यांनी मागे हटणार नसल्याचे संकेत दिले.
सोशल मिडीयावर सुळे या कायम सक्रिय असतात. शुक्रवारी (दि. ७) देखील त्यांनी, स्व. यशवंतराव चव्हाण यांची कविता पोस्ट केली आहे. आलं तर आलं तुफान-तुफानाला घाबरून काय करायचं, तुफानाला तोंड द्यायला शिकलं पाहिजे. तुफानापासून पळून जाणाऱ्या माणसाच्या हातून काही घडत नाही. तुफानाला तोंड देण्याची जी शक्ती आणि इच्छा आहे. त्यातनं तो काहीतरी करू शकतो आणि घडवू शकतो, अशी माझी धारणा आहे. ही स्व. यशवंतराव चव्हाण ७ मे १९८४ रोजी केलेली कविता आहे. ती पोस्ट करीत राजकीय संकटाला घाबरणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
शनिवारी शरद पवार यांचा एका सभेतील पावसात भिजल्यावर गाडीत बसतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्या फोटोखाली भाग गऐ रणछोड सभी, देख अभी तक खडा हूँ मैं, ना थका हूँ ना हारा हूँ, रण में अटल तक खडा हूँ मैं, या शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वर्णन केले आहे. सोशल मिडीयावर या पोस्टला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भाग गए रणछोड़ सभी,
— Supriya Sule (@supriya_sule) July 8, 2023
देख अभी तक खड़ा हूँ मैं
ना थका हूॅं ना हारा हूॅं
रण में अटल तक खडा हूॅं मैं pic.twitter.com/5mmGYWBm3o
दरम्यान, बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांची वाट खडतर झाल्याचे दिसुन येते. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात नव्याने पक्ष बांधणीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे कोणती रणनीती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आलं तर आलं तुफान... pic.twitter.com/YduO20VplI
— Supriya Sule (@supriya_sule) July 7, 2023