दाेन दिवसात पुणे विभागातील बाधित क्षेत्रांचे पंचनामे हाेणार पूर्ण ; विभागीय आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 06:24 PM2019-11-06T18:24:42+5:302019-11-06T18:26:58+5:30

दाेन दिवसात पुणे विभागातील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे.

the survey of affected area will be complete in two days ; regional commissioner | दाेन दिवसात पुणे विभागातील बाधित क्षेत्रांचे पंचनामे हाेणार पूर्ण ; विभागीय आयुक्त

दाेन दिवसात पुणे विभागातील बाधित क्षेत्रांचे पंचनामे हाेणार पूर्ण ; विभागीय आयुक्त

Next

पुणे : दाेन दिवसात पुणे विभागातील सर्व बाधित क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून ते शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डाॅ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुणे विभागात अतिवृष्टीमुळे 1 लाख 89 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून बुधवारी सकाळपर्यंत 90 हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. 

डॉ म्हैसेकर यांनी आज पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली. डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 74 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, त्या खालोखाल सांगली जिल्ह्याला फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनचे, सांगली जिल्ह्यात द्राक्ष-डाळिंबाचे, सातारा जिल्ह्यात भाताचे तर पुणे जिल्ह्यात कांदा, बटाटा, सोयाबीन, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यानुसार वेगाने काम सुरू आहे. दोन दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळू शकेल. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना रब्बी हंगामासाठी तातडीने कर्ज देण्याच्या बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी बँकांच्या प्रतिनिधीची बैठक घेण्यात आली असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.  

जिओ टॅगिंगचा वापर 
शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून भरपाई मिळण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करून फोटो काढून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत विमा कंपन्याच्या अधिकारी-प्रतिनिधींची बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
    

Web Title: the survey of affected area will be complete in two days ; regional commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.