कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी टोल नागका रस्तयाचे सर्व्हेक्षण सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:11 AM2020-12-24T04:11:25+5:302020-12-24T04:11:25+5:30
पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी,सोरतापवाडी, उरुळीकांचन, सहजपूर ही पुणे शहारालगत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे.त्यामूळे ...
पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी,सोरतापवाडी, उरुळीकांचन, सहजपूर ही पुणे शहारालगत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे.त्यामूळे वाहतुकीचे प्रमाण देखील जास्त आहे. दुचाकी, हलकी वाहने जड - अवजड वाहनांचे प्रमाण देखील जास्त आहे. कवडीपाट ते कासुर्डी या दरम्यान IRB चा टोल नाका अस्तित्वात होता मागील काही वर्षापासून तोही मुदत संपल्याने बंद आहे. त्यामूळे रस्त्याचे काम दीर्घ काळापासून प्रलंबित आहे. प्राणांकित अपघात वारंवार होत आहेत. अश्या अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. हे अपघात घडण्यास कारण असलेले बऱ्याच अडचणी पुणे ग्रामीण महामार्ग पोलीस बारामती फाटा याकडून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण(NHAI)यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आल्या होत्या.
या बाबतीत वेळोवेळी कवडीपाट ते यवत दरम्यान असणार्या गावातील स्थानिक नागरिकांनीही तक्रारी केल्या होत्या.या अडचणी लक्षात घेऊन NHAI ने या अडचणींचा सर्वेक्षण करण्यासाठी खासगी कंपनीकडे काम दिले आहे.या रस्त्यावर होणारे अपघात आणि त्यांना प्रतिबंध करण्याकरिता आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबतचा सविस्तर अहवाल NHAI ला सादर करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य,मुंबई डॉ.भुषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक,महामार्ग पोलीस,पुणे प्रादेशीक विभाग संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज नांदरे,लोणी काळभोर पोलीस पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूकचे संदीप देवकर,,यवत पोलीस,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व ध्रुव कंसल्टन्सीचे पदाधिकारी उपस्थित होते.
--
खालील दुरुस्तीNHAI मार्फत होणे आवश्यक आहे.
महत्वाच्या गावांच्या मुख्य चौकात तसेच ईतर ठिकाणी दुभाजक जिथे संपतो तेथे वेग नियंत्रित करणेसाठी रम्ब्लर स्ट्रिप, ब्लिंकर, साईनबोर्ड बसविणे थर्मोप्लास्टीक पट्टे मारणे,कॉटायन बसविणे, रस्त्याचे डांबरीकरण करणे, डिवायडर ची उंची वाढवणे, ठिकठिकाणी वाहतूक चिन्हे,स्पीड लिमिट चे बोर्ड लावणे, लाईट बार्रीयर, झाडे लावणे,,6) लेन मार्किँग चे पट्टे मारणे, उंच सखल भागाचे ठिकाणी मेटालिक क्रश बरियर बसविणे, लोणी स्टेशन चौक, एलाएट चौक,तळवाडी चौक येथे सिग्नल बसविणे
--
फोटो ओळ
२३कमवाकवस्ती कासुर्डी नाका
महामार्गावरील अडचणी कंपनी कर्मचाऱ्यांना सांगताना ग्रामस्थ