महापालिकेच्या प्रकल्पांची पाहणी
By admin | Published: May 22, 2017 04:56 AM2017-05-22T04:56:34+5:302017-05-22T04:56:34+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या सिंधनूर नगर परिषद (कर्नाटक) येथील नगरसदस्य व अधिकारी यांचे
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या सिंधनूर नगर परिषद (कर्नाटक) येथील नगरसदस्य व अधिकारी यांचे स्वागत कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी केले.
या अभ्यास दौऱ्यातील सदस्यांनी निगडी येथील जलशुद्धी केंद्र (स्काडा प्रकल्प), आकुर्डी येथील मैलाशुद्धीकरण केंद्र तसेच मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली.
या अभ्यास दौऱ्यामाध्ये नगर परिषदेचे अध्यक्षा मंजुळा पाटील उपाध्यक्षा अन्वर बेगम, स्थायी समिती सभापती नबी साहेब, नगरसदस्य व्यंकटेश, जफरअली जागीरदार, के. मरीयप्पा, सय्यद हाजीमस्तान, चंद्रशेखर सिदप्पा, शारदा जगदीश, अनिथा सिद्ररमेश, प्रभूराज मनोहर स्वामी, अयेशा बेगम ननुसा, पी. एस. वेराभद्रप्पा विरण्णा, हुसेनबी मोसीन साहब, यथामरी, कैसरंबेगम अलीसाब, सुमंगल मलिकार्जुन गौडा, आशाबी अब्दुल सत्तार, मुबारक बेगम, श्रेरनाबसवा एन. पाटील, एम़ मेहबूब रशिदा महंमदअली, मल्लाकार्जुन पाटील, अहंमद इकबाल, लक्ष्मी रमेश के, नगप्पा यंकप्पा गयनप्पा, एस़ नरसप्पा, महंमद शकुदिन नवाब, बसवराज नादगौडा, शेखरप्पा गिनीवर तसेच स्वीकृत सदस्य अहेमद खान, विजय कुमार, शिवकुमार जावली, वेकोंब बंगी, नवीन छाजद, कार्यकारी अभियंता जी. प्रभूशंकर, शामला, एच. आर. मुरलीधर, गिरीश नाईक, शरण बसवरात गुरुप्रसाद, कार्यालय अधिकारी जि. के. पाटील, सी. नागराज, शांता मुथैया, उमेश, वीरपाक्षी, शंकरप्पा, सुनील गिरद्दी यांचा समावेश होता.